आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदीय वित्त समिती आता घेणार शेतकऱ्यांच्या भेटी, दुष्काळावर पंचतारांकित हॉटेलात केली चर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात खास करून दुष्काळी भागात बँकांचे जाळे पसरवण्यासाठी काय करता येईल, त्यांच्यासमोर काय अडचणी आहेत, हे जाणून घेण्याबरोबरच सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या संसदीय वित्त समितीची बैठक पंचतारांकित हॉटेलात झाली.
वातानुकूलित वातावरणात तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न कसे कळणार असा आरोप झाल्यानंतर विदर्भात ही समिती शेतकऱ्यांच्या दारी जाणार आहे. होय, पुढील दौऱ्यात आम्ही शेतकऱ्यांशी थेट संवाद साधू, असे समितीचे सदस्य तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी बैठकीनंतर सांगितले. या समितीत खा. चंद्रकांत खैरे यांचाही समावेश होता.
सहकुटुंब तीर्थाटन :माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती रविवारी संध्याकाळी शहरात आली. त्यांचा मुक्काम त्याच पंचतारांकित हॉटेलात होता. यातील काही सदस्य सहकुटुंब येथे आले होते. बैठकीची वेळ सकाळी ची असली तरी त्याआधीच यातील काहींनी वेरूळला जाऊन घृष्णेश्वराचे दर्शन घेतले तसेच लेणीही पाहून घेतली. त्यानंतर ते बैठकीला पोहोचले.

प्रा.देसरडांनी घेतला आक्षेप : अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा हे बैठकीच्या ठिकाणी पोहोचले. मात्र त्यांना आत प्रवेश नाकारण्यात आला. थंड आरामात तुम्ही येथे बसला आहात, तुम्हाला शेतकऱ्यांच्या समस्या येथे कशा कळतील, असा थेट सवाल त्यांनी केला. तुमची ही बैठक म्हणजे कागदी घोडे असल्याचेही ते म्हणाले. आरोप केल्यानंतरही प्रा. देसरडा यांना बैठकीत प्रवेश देण्यात आला नाही.

दिग्विजय म्हणाले
प्रा.देसरडा यांच्या आरोपावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. काही शेतकऱ्यांशी बोलायला हवे होते, यावर सर्वांचे एकमत झाले. ही समिती लगेचच विदर्भात जाऊन अशीच आढावा बैठक घेणार आहे. त्या बैठकीपूर्वी आम्ही प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करू, असे दिग्विजय सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...