आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Partition After Alliance Declared; Shiv Sena Driver, BJP Owner

युती जाहीर होताच बंडाची निशाणे; शिवसेना चालक, भाजप मालक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गेल्या २५ वर्षापासून औरंगाबाद महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेना-भाजपने आगामी मनपा निवडणुकीसाठी युती जाहीर केली. ही घोषणा होऊन पाच मिनिटे होण्यापूर्वीच दोन्ही पक्षाच्या इच्छुकांनी उग्रावतार धारण करत नेत्यांसमोर बंडाची निशाणे फडकावली. ती पाहून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही चिंताग्रस्त झाले. आज यादी जाहीर केली तर नाराज माझ्या अंगावर चालून येतील, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. दानवेंनी आमदार अतुल सावे, माजी आमदार किशनचंद तनवाणींचा गेम केला असा संतप्त सूर उमटला. दुसरीकडे सहा महिन्यांपूर्वी शहरात स्थान निर्माण केलेल्या एमआयएमलाही बंडाची लागण लागली. उमेदवारीसाठी इच्छुक रस्त्यावर उतरले. त्यांनी नेत्यांसह तिकीट मिळालेल्यांनाही शिवीगाळ केली.

औरंगाबाद जिमखाना क्लब येथे सायंकाळी साडेपाच वाजता युतीची घोषणा करणारी पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शेकडो युती समर्थक क्लबच्या आवारातच होते. त्यापैकी भाजपचे मंडळ प्रमुख दिलीप देशमुख यांनी तर ही अशी युती केंल्याने इथे दिल्ली होईल असा इशारा देतानाच भाजपच्या पाच जागा आल्या तरी खूप आहे असे सांगत संतापाला वाट करून दिली. युतीचे नेते क्लबबाहेर पडत असताना भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी संतापाने धुमसतच तेथे आल्या. सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर त्यांना सामोरे गेले. महिलांसाठी राखीव वाॅर्डात महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांनाच पुढे केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पूर्वमध्येही शिवसेनेच्या वाट्याला अधिक जागा
औरंगाबाद पूर्वमध्ये भाजपाला अकरा तर शिवसेनेला बारा जागा देण्यात आल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पूर्वमध्ये मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघातले वार्ड येतात. त्यांनाही दानवेंनी विश्वासात घेतले नाही. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याशीही चर्चा केली नाही, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र, भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नाही. सर्वांना सोबत घेऊनच निर्णय घेतल्याचा दावा दानवेंनी केला.

पुढे वाचा... भाजप कार्यकर्ते नेत्यांवर नाराजी