आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pass Percentage Of Girls Increased By 3.22 Percent

आम्ही पोरी हुशार: मुली उत्तीर्णतेचे प्रमाण ३.२२ टक्के वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा निकाल चांगला आहे. विभागाचा एकूण निकाल ९०.५७ टक्के लागला, तर औरंगाबाद जिल्ह्याच्या निकाल ९१.८२ टक्के लागला. यंदाच्या निकालातही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली. ९२.४३ टक्के मुली आणि ८९.२१ टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. विशेष बाब म्हणजे ३.२२ टक्क्यांनी मुलींच्या उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे, अशी माहिती बोर्डाचे विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांनी दिली.
परीक्षेसाठी विभागातून एकूण लाख ६१ हजार ४३२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी लाख ६० हजार ६१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, तर औरंगाबाद जिल्ह्यातून ५८ हजार १५५ जण परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५८ हजार जणांनी परीक्षा दिली. जिल्ह्याचा एकूण निकाल ९१.८२ टक्के लागला आहे.
बोर्ड सदस्य शुल्क भरल्याने कारवाई : बोर्डाचेसदस्य शुल्क भरल्याने २५० शाळांच्या गुणपत्रिका राखून ठेवण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. बोर्ड दरवर्षी परीक्षा घेऊन निकाल जाहीर करत असते. त्यासाठी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यासाठी बोर्ड इंडेक्स नंबर आवश्यक असतो. त्याचप्रमाणे दरवर्षी बोर्ड मंडळाचे सदस्य शुल्क भरणेदेखील आवश्यक आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही २५० शाळांनी शंभर विद्यार्थ्यांमागे आकारण्यात आलेल्या एक हजार रुपये शुल्क अद्याप भरले नाही. परीक्षा झाली निकालही लागला तरीदेखील शाळांनी शुल्क भरल्याने आम्ही कडक पवित्रा घेत असून जोपर्यंत शाळा शुल्क भरत नाहीत तोपर्यंत गुणपत्रिका देण्यात येणार नाहीत, असे डेरे यांनी सांगितले.
कमी निकाल शाळांना भोवणार
ज्या शाळांचा निकाल ३० टक्क्यांच्या आत लागला आहे, अशा शाळांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना बोर्डाने शिक्षण विभागाला दिल्या आहेत. विभागात एकूण हजार २५९ शाळा आहेत. त्यापैकी ४१९ शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत. मात्र यात शाळा अशा आहेत की ज्यांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. तर १४ शाळांचे निकाल हे ३० टक्क्यांच्या आत आहेत, अशा शाळांचे निकाल का घसरले, काय अडचणी आहेत. प्रत्यक्षात काय होते आहे याची तपासणी करण्यात येईल, त्यानंतर त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे डेरे म्हणाले.
सहभागानुसार मिळणार क्रीडाचे गुण
आतापर्यंत क्रीडापटू असणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळत आले आहेत. मात्र यापुढे उत्तीर्ण होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सरसकट गुण मिळणार नाहीत तर सहभागानुसार हे गुण दिले जाणार आहेत. त्यात राज्यस्तरीय खेळात सहभागासाठी १५, प्रथम येणाऱ्या २० आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागास २० आणि मेडल मिळवल्यास २५ गुण देण्यात येणार आहेत.
यामुळे वाढली टक्केवारी
यंदाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. तणावमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका मिळाल्याने याचा बराच फायदा पाहायला मिळाला. यामुळे पेपर वेळेत सोडवता आला. अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे नियोजन करता आले आणि निकालाची टक्केवारी वाढली.
गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकनासाठीची प्रक्रिया
- गुणपडताळणीसाठी १५ ते २५ जूनदरम्यान अर्ज करायचे आहेत
- छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर पाच दिवसांच्या आत अर्ज करावे लागतील.
- उत्तरपत्रिका छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी- ते २६ जून २०१५