आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passenger Cross Railway Track Is Dangerously, Divya Marathi

पाच मिनिटे वाचवण्यासाठी तिघांचेही आयुष्य पणाला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद -संचखेड एक्स्प्रेस ही नांदेड-अमृतसर जाणारी रेल्वेगाडी दुपारी 2 वाजता प्लॅटफॉर्मवर जोरात येत असताना जाण्याच्या घाईमुळे महिला मुलांसह रेल्वे रूळ ओलांडत आहेत. प्रवासी नियम पाळत नाहीत. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली आहे.
हैदराबाद - औरंगाबाद पॅसेंजर ही रेल्वेगाडी दुपारी 1.45 वाजता रेल्वेस्टेशनवर येत असताना तरुणाने जीव धोक्यात घालून पटरी ओलांडली.

पाच प्लॅटफॉर्मपैकी तीनच कामाचे रेल्वेस्थानकात पाच प्लॅटफॉर्म असून यापैकी एका प्लॅटफॉर्मचे बांधकम सुरू आहे. एक, दोन आणि तीन प्लॅटफॉर्मवरच रेल्वे थांबतात.
रेल्वे दररोज धावतात औरंगाबाद रेल्वेस्थानकातून.

संचखेड एक्स्प्रेस ही नांदेड-अमृतसर जाणारी रेल्वेगाडी दुपारी 2 वाजता रेल्वेस्टेशवर येत असतानाही ज्येष्ठ व्यक्तीने जीव संकटात टाकून रेल्वे रूळ ओलांडला.

प्रत्येक जण वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात जिवावर उदार होताना दिसून येतो. असे काही प्रसंग सातत्याने रेल्वेस्थानकावर पाहावयास मिळतात. रेल्वे प्रशासनाचे नियम डावलून काही प्रवासी शॉर्टकट मारतात. दादरा पार करण्यासाठी काही मिनिटेच लागतात; परंतु तरुण, वृद्ध आणि महिलेने आपल्या चिमुकल्यासह रेल्वेगाडी येत असताना रूळ ओलांडून आयुष्य पणाला लावण्याचा प्रयत्न केला.