आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपोवन एक्सप्रेसमध्ये जागेच्या वादातून उपसल्या तलवारी; दोन भांडखोर पोलीसांच्या ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादातून एकमेकांविरोधात तलवार उपसल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी हरदिप गुरचरणसिंग (वय 35 वर्ष) आणि जसपाल दर्शनसिंग (वय 27 वर्ष) यांना मनमाड लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

शुक्रवारी (5 ऑक्टोबर) दुपारी तपोवन एक्सप्रेस औरंगाबादहून निघाली तेव्हा गाडीत जागा मिळवण्यासाठी गर्दी उसळी होती. एवढ्यात दोघांनी बोगीतच तलवार फिरवत जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. या प्रकाराची माहिती मिळताच मनमाड लोहमार्ग पोलिसांनी गाडी स्टेशनवर पोहोचताच दोघांनाही ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मिर्झा बेग करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...