आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Passengers Have Choked Breath Due To Technical Problem In Air India Flight

मुंबई-औरंगाबाद विमान बिघाड; प्रवाशांचा श्वास गुदमरला, प्रवाशांत हरिभाऊ बागडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, उपमहापौर प्रमोद राठोड, मनपा स्थायी समितीचे सभापती दिलीप थोरात यांच्यासह दीडशे प्रवासी घेऊन निघालेले एअर इंडियाचे विमान तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई विमानतळावरून वेळेत उड्डाण घेऊ शकले नाही. प्रवासी विमानात असताना ऑक्सिजन कमी मिळत असल्याने अनेकांचा श्वास गुदमरला. तांत्रिक त्रुटी दूर करून तब्बल पावणेचार तास उशिराने म्हणजेच रात्री ७.५० वाजता विमान औरंगाबादला पोहोचले.

हे विमान मुंबईहून दुपारी २.४० वाजता निघून ४ वाजेपर्यंत औरंगाबादला यायला हवे होते; पण बुधवारी तांत्रिक बिघाडामुळे ते झेप घेऊ शकले नाही. प्रवाशांना जवळपास एक ते दीड तास विमानात बंदिस्त करण्यात आले होते. आरडाओरड केल्यावर सर्वांना बाहेर काढल्याचे राठोड यांनी "दिव्य मराठी'ला सांगितले. विमानातील एसी बंद असल्याने अनेकांना गरमीचा त्रास झाल्याचे बागडे म्हणाले. उपमहापौर राठोड यांनी चिकलठाणा विमानतळ प्रशासनाकडे तक्रार दाखल केली.

तांत्रिक बिघाड
विमान उड्डाण घेण्यापूर्वी तांत्रिक बिघाड झाल्याने विमान पावणेचार तास उशिरा पोहोचले. मुंबईला जाण्यासाठी १२२ व येणारे त्यापेक्षा जास्त प्रवासी होते.
वसंत बर्डे, अधिकारी, एअर इंडिया, चिकलठाणा