आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कॉन्फ्युलन्स मीडिया' कॉल सेंटरचा ‘पासवर्ड हॅक’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चिकलठाणा एमआयडीसीतील ‘कॉन्फ्युलन्स मीडिया अँड वेब टेक्नॉलॉजी डोमेस्टिक कॉल सेंटर’चा पासवर्ड हॅक करून एक लाख 80 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मोबाइल कंपनीने सेवा बंद केल्याने फेब्रुवारी महिन्यापासून हे कॉल सेंटर बंद पडले होते.

19 फेब्रुवारी रोजी फईम खान मोहंमद रशीद खान यांच्या कॉल सेंटरचा पासवर्ड हॅक करून पहाटे तीन ते सहा वाजेदरम्यान इंटरनॅशनल कॉल करण्यात आले आणि मेसेज पाठवले. याचे 1 लाख 80 हजार रुपयांचे बिल आले. रिलायन्स कंपनीने बिल पाठवल्यानंतर खान यांना धक्काच बसला. बिल भरल्याशिवाय मोबाइल सुविधा पुरवण्यात येणार नाही, असा निर्णय रिलायन्स कंपनीच्या अधिकार्‍यांनी घेतल्याने खान यांच्यावर कॉल सेंटर बंद करण्याची वेळ आली. हतबल झालेल्या खान यांनी शेवटी बुधवारी सायंकाळी एमआयडीसी सिडको पोलिस ठाणे गाठत निरीक्षक अशोक सोनवणे यांची भेट घेतली. त्यांच्या तक्रारीवरून भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.