आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Patangrao Kadam\'s Drought Air Kite ; Lakhs Ruppes Spending Vain

पतंगराव कदमांची दुष्काळात हवाई ‘पतंग’बाजी; पावणेचार लाख ‘उडवले’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे उपोषण सोडवण्यासाठी पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम खासगी हेलिकॉप्टरने मंगळवारी औरंगाबादेत आले. मुंबईहून 12.55 वाजता निघालेले त्यांचे हेलिकॉप्टर औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या देवगिरी मैदानावर 13.55 वाजता लँड झाले. मुंडेंच्या उपोषणाची सांगता झाल्यानंतर 16.30 वाजता मंत्री मुंबईला रवाना झाले. या खासगी हेलिकॉप्टरचे तासाला 75 हजार रुपये भाडे होते. या हिशेबाने 12.30 ते 5.30 या पाच तासांचे 3.75 लाख रुपये खर्च झाले.


हेलिपॅडसाठी 50 हजार लिटर पाणी
जिल्हाधिका-यांनी ऐन वेळेवर हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी दिली. हेलिपॅड तयार करण्यासाठी सुमारे 5 टॅकर म्हणजे किमान 50 हजार लिटर पाणी उडवण्यात आले.


80 हजारांत झाला असता दौरा
हेलिकॉप्टरने कदम, त्यांचे सचिव, राज्यमंत्री रणजित कांबळे, पांडुरंग फुंडकर आले होते. ते विमानाने आले असते तर हा दौरा 80 हजारांत झाला असता, शिवाय पाणी वाचले असते.