आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर खड्डा बुजवून पेव्हर ब्लॉकचे पॅचवर्क झाले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्त्यावर दोन खड्डे, त्यात पेव्हर ब्लॉक व मजुरीचे पैसे मिळत नसल्याने त्याचे पॅचवर्क कसे करायचे याचा वाद. त्यामुळे रखडलेल्या सिडको एन-5 मधील एचपीसीएल कार्यालय ते मनपा क्रीडा संकुल टाऊन सेंटर या रस्त्यावरील खड्ड्यांच्या पॅचवर्कचे काम अखेर डीबी स्टारच्या वृत्तामुळे मार्गी लागले. बातमी प्रसिद्ध होताच दोनच दिवसांत हे महत्त्वाचे काम झाले.
गेल्या दहा वर्षांपासून हा रस्ता व्हावा म्हणून परिसरातील असंख्य नागरिकांनी पालिकेकडे चकरा मारल्या; पण अधिकारी दाद देत नव्हते. अखेर नगरसेवक प्रशांत देसरडा यांनी पावसाळ्यात डांबरीकरणाचे काम बंद असल्यामुळे तात्पुरती मलमपट्टी म्हणून या खड्ड्यांत पेव्हर ब्लॉक बसवून पॅचवर्क करण्याची कल्पना सुचवली. या पॅचवर्कच्या कामाला सुरुवात झाली, मात्र, पहिल्या दिवशी दोन ठिकाणी खड्डे उकरून ठेकेदार पसार झाला. आधी होते त्यापेक्षाही मोठे खड्डे करून ठेवले त्यामुळे दहा दिवसांपापेक्षा जास्त काळ वाहनचालकांच्या त्रासात आणखी भर पडली होती. त्यावर 16 जुलै रोजी डीबी स्टारने ‘पालिकेने वाढवली नागरिकांची अडचण’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून या समस्येला वाचा फोडली. त्यानंतर दोनच दिवसांत हे काम पूर्ण झाले.
इकडेही लक्ष द्या
याच मार्गावरील मनपा क्रीडा संकुलालगत असलेल्या सिडको एन-5 ते जालना रस्त्याला जोडणार्‍या मोठ्या रस्त्याला जागोजागी खिंडारे पडली आहेत. येथे रोज अपघात होतात. या ठिकाणीही याच पद्धतीचे पॅचवर्क करून वाहनधारकांची खड्ड्यांतून सुटका करावी, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.