आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - ‘कुणीही येतो, वाटेल ती फाइल घेऊन जातो, कशाचाच पत्ता लागत नाही. एक आयुक्तांचे कार्यालय सोडले तर संपूर्ण मनपात फायलींचे इनवर्ड-आऊटवर्ड होत नाही,’ असे सांगत शहर अभियंता एस. डी. पानझडे यांनी पॅचवर्कची चौकशी करणार्या समितीला कामांची मोजमाप पुस्तिका व फायली तत्काळ देणे अवघड असल्याचे सांगत प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचीच जाहीर कबुली दिली. या फायलींवरून प्रत्येक वॉर्डाच्या अधिकार्यांची हजेरी झाल्यानंतर आठवडाभरात फायली देऊ असे त्यांनी सांगितले.
शहरातील खड्डय़ांबाबत ‘दिव्य मराठी’ने मालिका प्रकाशित केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीने पॅचवर्कच्या कामांची चौकशी करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समिती नेमली होती. या समितीला वॉर्ड कार्यालयांकडून कामांच्या फायलीच मिळत नसल्याने काम ठप्प असल्याचे या समितीचे सदस्य जगदीश सिद्ध यांनी सांगितले. ते म्हणाले की, या कामात 6 ते 7 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा संशय असून फायली आणि मोजमाप पुस्तिकाच दिल्या गेलेल्या नाहीत. मुख्य लेखा परीक्षक मो. रा. थत्ते यांनी सहा वेळा स्मरणपत्रे पाठवून ही अवस्था आहे. पॅचवर्कशिवाय इतर कामांच्या 75 फायली गायब आहेत. समितीला आतापर्यंत 30 फायली दिल्या गेल्या. त्यातील फक्त 9 मध्येच मोजमाप पुस्तिका आहेत. 40 फायली अपूर्ण होत्या.
यावर सभापती नारायण कुचे यांनी थत्तेंसह वॉर्डाधिकार्यांना उभे करीत फायलींच्या संख्येचा सोक्षमोक्ष लावला. हे सुरू असताना संबंधित अभियंते, कार्यकारी अभियंते यांची नेमक्या संख्येवरून चर्चा उर्वरित पान.8
महापालिकेतून पॅचवर्कच्या मोजमाप पुस्तिकाच गायब
होत होती. अखेर सर्व वॉर्डांच्या मिळून 37 फायली व मोजमाप पुस्तिका येणे बाकी असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. त्यापैकी वॉर्ड फ च्या सर्वाधिक 22 फायली बाकी असल्याचे समोर आले. या बहुतेक अधिकार्यांनी सोमवारी फायली देतो असे सांगितले, पण शहर अभियंता एस.डी. पानझडे यांनी सोमवारी फायली देऊ असे अधिकारी सांगत असले तरी ते शक्य नाही असे सांगत मनपाचा कारभार किती भोंगळ चालतो हेच सभागृहासमोर मांडले. सुरेंद्र कुलकर्णी यांनी मोजमाप पुस्तिका टेबलांवर फिरते की शहरभर फिरते असे विचारत या कारभारावर टीका केली. अखेर समितीला हव्या असणार्या फायली सोमवारपर्यंत देण्याचे आश्वासन पानझडे यांनी दिले. या चर्चेदरम्यान सभापतींनी फायलींबाबत बोलताना अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.