आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पटेल खून खटल्याची सीबीआय चौकशी करा, विशेष पोलिस महानिरीक्षकास खंडपीठाची नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औरंगाबाद तालुक्यातील गाढेजळगाव येथील अब्दुल हक पटेल खून खटल्याचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती संभाजी शिंदे न्यायमूर्ती संगीतराव पाटील यांच्यासमोर प्राथमिक सुनावणी झाली असता त्यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना नोटीस बजावली आहे.

गाढेजळगाव येथील अब्दुल हक पटेल यांचा १५ मे २०१६ रोजी दिवसाढवळ्या खून करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी राजकीय दबाव आणून तपासात अडथळा निर्माण करत आहेत. यामुळे तपास नि:पक्षपाती होत नसल्याने या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीमार्फत करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका अयनुल हक पटेल यांनी अॅड. रूपेशकुमार बोरा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली. या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली असता खंडपीठाने औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. या याचिकेवर पुढील सुनावणी २५ ऑक्टोबरला होणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने अॅड. सूर्यकांत मुंडले यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...