आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेनहोलची उंची वाढवली तरच नहरीला पाणी येणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने पाणचक्की नहर सर्वेक्षणाचे कार्य सुरू केले असून आतापर्यंत 90 टक्के कार्य झाले आहे. नहरीत मोठय़ा प्रमाणात गाळ साचलेला आहे. काही ठिकाणी जास्त, तर काही ठिकाणी कमी गाळ असल्याचे आढळले आहे. त्यामुळेच गाळ काढणे आणि मेनहोलची उंची वाढवल्याशिवाय नहरीला मोठय़ा प्रमाणात पाणी येणार नाही, असे मत सर्वेक्षण समितीचे सदस्य डॉ. रमझान शेख यांनी नोंदवले.

नहरीच्या आत दुरुस्तीचे काम फार जास्त नाही; पण गाळ साचल्यामुळे नहरीचे पाणी कमी झाले आहे. वस्तुत: नहरीत अशी व्यवस्था आहे की, नहरीच्या आत मूठभर गाळसुद्धा साचणार नाही. यामुळेच शेकडो वर्षे नहरीत गाळ साचला नाही. नहरीमध्ये तलाव किंवा नदीचे पाणी प्रत्यक्षात येत नव्हते. पाणी हे नेहमीच झर्‍याच्या रूपाने जमिनीच्या आतून झिरपून नहरीत येत असे. 1935 मध्ये निझाम सरकारने पहिल्यांदा हा गाळ उपसण्याकरिता नहर अंबरी व नहर पाणचक्कीचे मेनहोल उघडून गाळ साफ केला. तसेच मेनहोल भूपृष्ठाच्या वरपर्यंत बांधून त्यावर लोखंडी झाकण लावले. मात्र, गेल्या 20 वर्षांत नहरीच्या आजूबाजूला वस्ती वाढल्यामुळे नहरीच्या मेनहोलचे झाकण चोरी गेले. इतकेच नव्हे तर विटाही चोरून नेल्या.

परिणामी अनेक मेनहोल जमिनीच्या पृष्ठभागावर राहिल्यामुळे माती, रेती, गाळ, दगड, कचरा नहरीत जाऊ लागला. अनेक ठिकाणी लोकांनी या मेनहोलचा कचराकुंडीसारखा वापर केला. त्यामुळेच नहरीत मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. हे गाळ उपसण्याचे काम लवकर केले पाहिजे, असेही डॉ. शेख यांनी म्हटले आहे.