आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पे अँड पार्क’ धोरणाला नगरसेवकांचा विरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - वाहनतळांच्या व्यवस्थेसाठी सरसावलेले आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर हे ‘पे अँड पार्क’ धोरणामुळे कचाट्यात सापडले आहेत. रस्त्याच्या कडेला वाहने उभी करणार्‍यांकडून शुल्क आकारण्याच्या निर्णयाला नगरसेवकांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच शुल्क आकारणीचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचा आरोप स्थायी समितीचे सभापती विकास जैन यांनी केला आहे. या धोरणात्मक निर्णयाला सर्वसाधारण किंवा स्थायी समिती यापैकी एकाही सभागृहाची मान्यता नसल्याने आयुक्त पदाधिकार्‍यांच्या रोषाचे धनी ठरण्याची चिन्हे आहेत. रस्त्यावर उभ्या राहणार्‍या वाहनांसाठी शुल्क आकारण्याबाबतचा कोणताही धोरणात्मक निर्णय या सभागृहाने यापूर्वी घेतलेला नाही. शुल्कनिश्चिती तसेच आकारणीपूर्वी डॉ. भापकर यांनी सभागृहाची मान्यता घेण्याबरोबरच त्याआधी पालिकेतील पाचही पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, डॉ. भापकर यांनी तसे न करता स्वत:च शुल्क निश्चित केले आणि लगेच त्याची अंमलबजावणीही सुरू केली.

निराला बाजार येथील रस्त्यावर वाहने उभी राहतात. तेथे शुल्क आकारणीचा प्रयत्न केला तर तो उधळून लावला जाईल, असा इशारा नगरसेवक समीर राजूरकर यांनी दिला आहे. सिडको एन-6 येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी येणार्‍यांकडून पार्किंग शुल्क कसे आकारले जाऊ शकते, असा प्रश्न हुशारसिंग चव्हाण यांनी उपस्थित केला.