आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या माेबाइलवर लक्ष ठेवलेच पाहिजे - अमितेशकुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - तरुण,तरुणींचे प्रेमप्रकरण, फेसबुक, व्हॉट्सअॅप, इंटरनेटचा अती वापर यामुळे गुन्हे तसेच तक्रारींचे प्रमाण वाढत आहे, परंतु ते काय करत आहेत, ते काय पाहत आहेत, ते कुणाशी बोलत आहेत, यावर पालकांनी लक्ष ठेवलेच पाहिजे. मुलांना स्वातंत्र्य असावे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या काळात पाल्यांच्या कृतीवर लक्ष ठेवणे गरजेचे असून स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असू द्या, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले.

औरंगाबाद लेडीज असोसिएशनतर्फे बुधवारी कै. भानुदास चव्हाण सभागृहात महिलांवर वाढते अत्याचार या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिलांनी विविध सामाजिक तसेच पोलिस प्रशासनाविषयी माहिती जाणून घेतली. या वेळी व्यासपीठावर अपर्णा कुमार, प्रभा माछर, सुषमा शहा, अल्पा जैन, बबीता लीला, रेखा राठी, सरोज बगाडिया, तनुजा गांधी यांची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...