आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमायतबागेत विजेच्या तारांमुळे मोराचा मृत्यू, घार गंभीर जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - निसर्गपूरक वातावरणामुळे हिमायत बागेच्या विस्तीर्ण परिसरात मोरांसह इतर विविध पक्ष्यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र, दिल्ली गेटच्या बाजूलाच महावितरणचे वीज उपकेंद्र असल्याने येथे विद्युत तारांचे मोठे जाळे पसरलेले आहे. या तारांना स्पर्श झाल्याने एका मोराचा मृत्यू, तर अन्य एक पक्षी गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. यामुळे किमान या परिसरात तरी इन्सुलेटेड तारा बसवण्याची मागणी पक्षीप्रेमींकडून होत आहे.
ऐतिहासिक भला मोठा विस्तीर्ण परिसर, दाट झाडी, वाहतूकमुक्त भाग असल्याने हिमायतबागेमध्ये पूर्वीपासून मोर सापडतात. सध्या या ठिकाणी जवळपास ४० मोर आहेत. तसेच इतर देशी पक्ष्यांचीही संख्या खूप मोठी आहे. मोरांना उंच उडता येत नाही. त्यामुळे ते बरेचदा कुत्र्यांच्या तावडीत सापडतात. तशा घटनाही यापूर्वी घडल्या होत्या. कुत्र्यांचा उच्छाद रोखण्यासाठी हिमायतबाग प्रशासनाने या परिसराला तारेची फेन्सिंग करून घेतली. तसेच गेटवर सुरक्षारक्षकाची नेमणूक केली. परिणामी कुत्र्यांच्या तावडीतून मोरांची सुटका झाली. पण आता विजेच्या तारांमुळे येथील मोर संकटात सापडले आहेत.

लोंबकळत्या तारा
बागेतील बहुतांश तारांचा ताण कमी होऊन त्या बऱ्यापैकी खाली लोंबकळत आहेत. तसेच ज्या ठिकाणी मोराचा मृत्यू झाला होता, त्या पोलवर एका तारेचा तुकडा जवळपास पाच फूट खाली आलेला आहे. या तुकड्याचा अंदाज आल्यानेच मोर त्यावर धडकला असावा, असा अंदाज येथे नियमित फिरण्यास येणाऱ्या नागरिकांनी वर्तवला.
तारांच्या बाजूला रिफ्लेक्टर लावावेत
मोरांसाठी हा अपघातच अाहे. यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी तारांच्या आजूबाजूला रिफ्लेक्टर बसावावेत. नाही तर तारा इन्सुलेटेड केल्या जाव्यात. दिलीपयार्दी, पक्षीतज्ज्ञ

इन्सुलेटेड तारा बसवाव्यात
आम्ही नेहमी हिमायत बागेत येतो. एप्रिल रोजी मोर मृतावस्थेत आढळला, तर एप्रिल रोजी घार जखमी दिसली. येथील तारा इन्सुलेटेड केल्यास अशा घटना घडणार नाहीत. राजेशवेताळ, सजगतरुण

शवविच्छेदनातून उलगडला प्रकार
आठ एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे नागरिक मॉर्निंग वॉकसाठी आलेले होते. या वेळी त्यांना दिल्ली गेटजवळील एंट्री पॉइंटच्या समोरच तारेखाली मोर मृतावस्थेत आढळला. नागरिकांनी याबाबत सुरक्षारक्षकाला कळवले. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी येऊन पंचनामा केला. मोराचे शवविच्छेदनही केले. त्यात विजेचा धक्का बसून मोराचा मृत्यू झाल्याचा अहवाल अाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे नऊ एप्रिल रोजी त्याच ठिकाणी एक घार बेशुद्धावस्थेत पडलेली होता. राजेश वेताळ, संतोष कल्याणकर या तरुणांनी त्या घारीला पाणी पाजले, त्यानंतर थोडी शुद्ध आली. मात्र, ती उडत नव्हती. शेवटी तिला वन विभागाकडे दिले. तिथे तिच्यावर उपचार केल्यानंतर ती बरी झाली.

आमचा तसा संबंध नाही
विजेच्या धक्क्याने मोराचा मृत्यू झाला. त्यानंतर घारीलाही विजेचा धक्का बसला. या परिसराचा वन विभागाशी संबंध नाही. त्यामुळे हिमायतबाग आणि महावितरणनेच काळजी घ्यावी. रत्नाकरनागापूरकर, वनपरिक्षेत्रअधिकारी, वन विभाग

इन्सुलेटेडतारा बसवाव्यात
येथे पक्ष्यांचे प्रमाण अधिक आहे. तसेच महावितरणचे उपकेंद्र असल्याने तारांचे जाळेही मोठ्या प्रमाणात आहे. पक्षांना इजा हाेऊ नये, यासाठी महावितरणने इन्सुलेटेड तारा बसवण्याची गरज आहे. तशी आम्ही लेखी मागणी करणार आहोत. संजयपाटील सोयगावकर, शास्त्रज्ञ,हिमायतबाग

इन्सुलेटेड तारांचा विचार करू
हिमायत बागपरिसरामध्ये इन्सुलेटेड तारा बसवता येतील. तसे मी कार्यकारी अभियंत्यांना एकदा पाहणी करायला सांगतो. त्यानंतर इन्सुलेटेड तारांचा विचार करू. पक्ष्यांना इजा होणार नाही, यासाठी काळजी घेऊ. प्रभाकरनिर्मळे, अधीक्षकअभियंता (शहर), महावितरण

आम्ही मागणी करणार
हिमायत बागपरिसरामध्ये जवळपास ४० मोर अाहेत. तसेच इतर देशी पक्ष्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या परिसरामध्ये इन्सुलेटेड तारा बसवणे गरजेचे आहे. तशी आम्ही मागणी करणार आहोत. डॉ.किशोर पाठक, पक्षीमित्र
बातम्या आणखी आहेत...