आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेथीची जुडी २० रुपयांना; कांदा मात्र झाला स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मेथीच्या भाजीची आवक अत्यल्प असल्याने किरकोळ बाजारात एका जुडीसाठी २० रुपये मोजावे लागत आहेत. पूर्वी हेच दर १० ते १५ रुपयांवर कधीच गेले नव्हते. हवामानातील बदल आणि पर्जन्यमानातील खंडामुळे पालेभाज्या, डाळी, धान्यांचा पुरवठा कमी होत आहे. परिणामी भाव दुपटीने वधारले आहेत. पालक, शेपू आणि कोथिंबिरीची एक जुडी १० रुपये, शेवग्याची शेंग प्रतिकिलो ८०, हिरवी मिरची ४०, दोडका ६०, गवार ६०, कारले ६०, गाजर ६०, फुलकोबी ६०, पत्ताकोबी ३० , चवळी ६०, वांगे ४०, बटाटे १५ ते २० रुपये प्रतिकिलो भाव होता. कांद्याची नवीन आवक सुरू झाली आहे. विदेशातून कांदा आयात करण्यात आला आहे. यामुळे कांद्याचे दर नियंत्रणात आले असून ४० रुपये दराने मिळू लागला आहे.