आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाईच्या धसक्याने हेल्मेट खरेदीला झुंबड, नियम मोडणाऱ्यास होणार ६०० रुपये दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिसांच्या धाकामुळे शहरातील हेल्मेट विक्रीच्या दुकानात शनिवारी अक्षरश: झुंबड पाहायला मिळाली. एक फेब्रुवारीपासून शहरात हेल्मेट सक्ती होणार आहे. हेल्मेट घालणाऱ्या दुचाकीस्वाराला ६०० रुपये दंड भरावा लागणार आहे. हा दंड भरण्यापेक्षा हेल्मेट खरेदीवर आैरंगाबादकरांनी भर दिला.

शहरात सुमारे सहा लाखांवर दुचाकी वाहने आहेत. यापैकी २० टक्के वाहनधारकही हेल्मेट वापरत नाहीत. मात्र आता सक्तीची घोषणा झाल्यानंतर मात्र वाहनधारक हेल्मेट खरेदीसाठी गर्दी करत आहेत. शहरातील बहुतांश महाविद्यालयांनीही हेल्मेट सक्तीसाठी पुढाकार घेतला असून जे विद्यार्थी कर्मचारी हेल्मेट वापरतील त्यांनाच महाविद्यालयाच्या पार्किंगमध्ये वाहन लावता येणार आहे. काही संस्थांनीही पुढाकार घेत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी थेट डीलरशी संपर्क करत वाजवी दरात हेल्मेट खरेदी केली आहे.
एक फेब्रुवारीपासून हेल्मेट सक्ती केली जाणार असल्याने नागरिकांनी हेल्मेट विक्रीच्या दुकानावर झुंबड उडाली होती. छाया : रवी खंडाळकर