आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Cut Road Divider That Why Increases Road Accident

दुभाजकांवर आघात अपघातांना आमंत्रण, व्यावसायिकांची सोयीनुसार तोडफोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्यापारी आणि त्या त्या भागातील रहिवासी स्वत:च्या स्वार्थासाठी दुभाजक फोडून रस्ता तयार करतात. मग तेथून वाहनांची घुसखोरी सुरू होते आणि अपघातांना आमंत्रण मिळते. त्यातच पथदिव्यांची कमतरता परिणामी होणारा अंधार यामुळे तर हे फुटके दुभाजक आणखी धोकादायक ठरतात. कोण कधी मधून घुसेल आणि भरधाव धावणाऱ्या गाडीवर धडकेल हे सांगता येत नाही. ही परिस्थिती शहरातील सर्वच रस्त्यांवर दिसते. दुभाजक कसे असावेत, किती अंतरावर त्याला गॅप असावा, अशा कुठल्याही नियमांची माहिती अधिकाऱ्यांनाही नाही. त्यामुळेच ही भयंकर समस्या निर्माण झाली असून रस्त्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे.

सुरक्षित वाहतुकीसाठी, रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूने ये-जा करणारी वाहतूक रस्त्याच्या सरळ रेषेत मार्गस्थ व्हावी यासाठी स्थानिक स्वराज संस्थांमार्फत वाहतूक दुभाजक उभारले जातात. ठरावीक अंतरात जिथे चौक असतात त्याला वळसा घालूनच रस्ता पार करण्याचा नियम आहे. पण आपल्या शहरात असे होत नाही. काही मंगल कार्यालये, हॉटेल्स, पेट्रोल पंपधारक, व्यापारी प्रतिष्ठाने आणि काही वसाहतधारकांनी स्वत:च्या सोयीनुसार दुभाजकांमध्ये खिंडारे पाडली आहेत.

नियमांची पायमल्ली
दुभाजकदुरुस्ती, रंगीत पट्टे ओढणे, दुभाजक असल्याचे सूचना फलक लावणे, रिफ्लेक्टर आणि जिथे रस्ता ओलांडण्यासाठी दुभाजकांमधील दोन्ही बाजूने ठेवलेल्या मोकळ्या जागेत पांढरा पट्टा मारून त्यावर कॅट ऑइज बसवणे, यावर मनपाने दरवर्षी नगरविकास विभागातून मिळणाऱ्या रस्ता अनुदानामधून १० टक्के खर्च करणे अनिवार्य आहे. तसा लेखी आदेशच नगरविकास विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना बजावला आहे. मात्र, ते औरंगाबाद मनपाने धाब्यावर बसवल्याचे दुभाजकांची स्थिती पाहिल्यावर लक्षात येते.

२०वर्षांपासून दुर्लक्ष
जागोजागीतोडफोड, लंपास झालेल्या लोखंडी ग्रील, वेळोवेळी होणारी रस्त्याची दुरुस्ती आणि व्हाइट टाॅपिंगच्या रस्ता दुरुस्तीत दुभाजक आणि रस्त्याची लेव्हल सारखी झाल्याने दुभाजक दिसेनासे झाले आहेत.

नागरिकही कंटाळले
नगरविकासविभागाकडून ३० टक्के अनुदान आणि मनपाच्या ५० टक्के अनुदानातून कोटी १६ लाख १७० रुपये दुभाजकांवर खर्च करण्यात आले. मात्र, तरीही ते नियमानुसार झाले नाहीत. डीबी स्टार चमू हे धोकादायक दुभाजक कॅमेऱ्यात कैद करत असताना अनेक नागरिकांनी आम्ही मनपा, नगरसेवक,आयुक्त वॉर्ड अधिकाऱ्यांना तक्रारी केल्या, पण काहीही परिणाम झाला नसल्याचे सांगितले.

मनपा अधिकाऱ्यांची भेट घेऊ
- दुभाजकांची जागोजागी तोडफोड झाल्यामुळे लोक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून कुठूनही वाहने घुसवतात. शिवाय चौकातील वाहतूक सुरळीत करावी की खिंडारातून घुसखाेरी करणाऱ्यांना आहेवरावे अशी द्विधा मन:स्थिती वाहतूक कर्मचाऱ्यांची होते. यासाठी मी शहरातील दुभाजकांचा अभ्यास करून मनपातील संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. खुशालचंदबाहेती, सहायकपोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

नकाशानुसार सर्वेक्षण करावे
- दुभाजक किमान १८, २४ आणि ३० मीटर रुंदीच्या रस्त्यावर असावेत. १८ मीटर रस्त्यावरच्या दुभाजकाची रुंदी किमान ०.६ तर उंची किमान ०. ४५ मीटर असावी. २४ मीटर रस्त्यावर रुंदी १.२ उंची ५.९ मीटर, तर ३० मीटर रस्ता दुभाजकाची रुंदी मीटर उंची १.५ मीटर असावी. संपूर्ण शहरातील दुभाजकांचे सर्वेक्षण करून तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करता येऊ शकते. -एम.डी. सोनवणे, माजीशहर अभियंता

यापुढे नियंत्रण ठेवू
- रस्ता अनुदानामधून किमान १० टक्के निधी वाहतूक पोलिस यांच्याशी सल्लामसलत करून आम्ही शहरातील दुभाजकांवर यापुढे खर्च करणार आहोत. यापुढे शहरातील चौक रस्त्यांवर वाहतूक नियंत्रण व्यवस्था निर्माण करणार. लेन मार्किंग निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांतील पट्टे आखणार. दुभाजकावर सूचना फलक लावणार आहोत. लोकांनीही यासाठी सहकार्य करावे. -सखारामपानझडे, शहरअभियंता, मनपा