आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खबरदार! पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करू, डॉ बामूचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संरक्षक भिंती पाडल्या तर संबंधितांकडून नुकसान भरपाई वसूल केली जाईल, असा स्पष्ट इशारा विद्यापीठ प्रशासनाने दिला आहे. भिंती पाडून अतिक्रमण केल्यास थेट गुन्हे दाखल केले जातील, असेही या वेळी बजावण्यात आले आहे.
विद्यापीठाचा परिसर तब्बल २५० एकर आहे. विद्यापीठ परिसरात जनावरे येऊ नयेत अतिक्रण होऊ नये यासाठी संपूर्ण परिसराला दगडाच्या मोठ्या संरक्षक भिंती बांधल्या होत्या. मात्र, नाट्यशास्त्र विभागाच्या मागच्या बाजूने बघितल्यास येथे अनेकांनी अतिक्रमण केले होते.
या संरक्षक भिंती तोडून लोक दगड, मुरूम आणि मातीची चोरी करत होते. या प्रकरणी डीबी स्टारने वृत्त प्रकाशित करताच सुरुवातीला अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाने तोडण्यात आलेल्या भिंती बांधल्या. हे करतानाच यानंतर कुणीही विद्यापीठाच्या जागेवर अतिक्रमण केल्यास थेट खटले दाखल करण्यात येतील, असा इशाराही परिसरातील नागरिकांना देण्यात आला.