आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पचंवीस वर्षांपासून करतो दुर्गंधीशी सामना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक ४९ गुलमोहर कॉलनीअंतर्गत टेलिकॉम हाउसिंग सोसायटीतील नागरिकांना मागील २५ वर्षांपासून नालीचा त्रास होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नालीत ड्रेनेजलाइनचे पाणी सोडण्यात आले आहे. दुर्गंधी आणि डासांचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत. महानगरपालिका फवारणी करत नाही. मागील २५ वर्षांपासून नालीची समस्या कायम भेडसावत असतानाही याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहेत.

१९८७ मध्ये निर्माण झालेल्या सोसायटीचा रस्ताही महानगरपालिकेने तयार केलेला नाही. साईनगर आणि टेलिकॉम हाउसिंग सोसायटीमध्ये २५ वर्षांपूर्वी सिडको प्रशासनाने नाली तयार केली. पावसाचे पाणी जाण्यासाठी बनवलेल्या नालीत ड्रेनेजचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. सध्या सर्वत्र डेंग्यू आजाराने लोक भयभीत झाले आहेत. नाली बजरंग चौकमार्गे वळवण्यात यावी, वेळोवेळी सफाई करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन देऊनही कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याचे राम निंबाळकर यांनी सांगितले.