आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horrible: ही नदी नाही, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील औरंगाबाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हे फोटो पुण्यामुंबईतील किंवा नाशिकचे नक्कीच नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी लातूरला मिरजेसमोर हात पसरावे लागणाऱ्या मराठवाड्यातील औरंगाबादचे आहेत. विश्वास बसणार नाही. पण ठेवावा लागेल. नाव नसलेली ही नदी दर दोन दिवसांआड औरंगाबादच्या रस्त्यांवरुन वाहते. आता तुम्ही म्हणाल गोदावरीला पाणी नाही. मग औरंगाबादमध्ये नदी कोठून आली. तर ही आहे मानवनिर्मित नदी. मानवाच्या असंवेदनशिलतेची, मुजोरपणाची नदी. आपले काही बंधू पाण्यासाठी भीक मागत असताना आपण मात्र पाण्यात डुंबण्याचा आनंद लुटण्याची मानसिकता जपणाऱ्या लोकांची नदी. खरंच लाज वाटली पाहिजे.
भीषण पाणी टंचाई असल्याने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील लातूर या शहराला रेल्वेच्या माध्यमातून पाणी पुरवण्यात येत आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथील आयपीएलचे सामने हलविण्यात आले आहेत. मराठवाड्यातील बिअर कंपन्या उन्हाळ्यात बंद करण्यासंदर्भात हालचाली सुरु झाल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानीचे पाणी लातूरला देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पाणी वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करण्यावर केवळ औरंगाबादच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रात भर दिला जात आहे.
पण औरंगाबादमध्ये जरा विचित्र परिस्थिती दिसून येते. नळाला पाणी आले, की आपण जणू अरबी समुद्रात राहतो अशा आविर्भावात पाण्याची नासाडी केली जाते. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप येते. पावसाळ्यात दिसावे तसे भर उन्हाळ्यात जागोजागी पाणी साचले दिसते. फुटलेले नळ प्रशासनाच्या दुर्लक्षाने अखंड वाहत असतात. लाखो लिटर पाण्याची अशी नासाडी केली जाते. आता काय म्हणाल या मानसिकतेला, सवईला. खरंच नागरिक संवेदनशिल आहेत? एकिकडे कळशीभर पाण्यासाठी महिला भल्या पहाटेपासून पायपिट करत असताना पाणी वाया घालविणाऱ्यांना तुम्ही काय म्हणाल... तोंडात एखादी शिवी नक्कीच येईल!!!
नाशिकच्या देवळा तालुक्यात पाणी आणायला गेलेल्या तिघा मायकेलांचा मृ्त्यू
कळवण येथील लक्ष्मीबाई विष्णू गांगुर्डे (वय 33), त्यांची मुलगी रेणुका (वय 12) आणि मुलगा अनिल (वय 10) कनकापूर शिवारातील एका विहिरीवर काल पाणी भरायला गेले होते. दोर बादलीने पाणी काढत असताना अनिलचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी आई आणि बहिणीने विहिरीत उड्या मारल्या. त्यांना अनिलचा जीव तर वाचवता आला नाहीच. पण दोघींचाही यात मृत्यू झाला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील औरंगाबाद शहराचे काही नागरिक कसे बिनधास्तपणे पाणी वाया घालवतात... खरंच यांना लातूरच्या आपल्या बांधवांची चिंता आहे... खरंच आपण कधी सुधरणार... बघा डोळे उघडणारे फोटो....
बातम्या आणखी आहेत...