आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपमधील "इनकमिंग' तूर्तास थांबले! पक्षबदलाचे वारे वाहण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - केंद्रापाठोपाठ राज्यात सत्तेत आल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेशाचा सपाटा लावला होता. स्थानिक पातळीवरही अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला, परंतु गेल्या काही दिवसांपासून चित्र बदलले असून भाजपमधील इनकमिंग थांबल्याचे दिसून येते.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी माजी आमदार किशनचंद तनवाणी यांच्यासह तीन नगरसेवकांनी पक्षात प्रवेश केला. त्यानंतरही पक्षात प्रवेश घेण्यासाठी चढाओढ सुरू होती. परंतु गेल्या महिन्यापासून पक्षात प्रवेश करण्याची इच्छा असणाऱ्यांनीही निर्णय पुढे ढकलला आहे. यात सिडको व हडकोतील ७ नगरसेवकांचा समावेश आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता आत्ता काँग्रेस किंवा राष्ट्रवादी तसेच शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्यात फायदा नाही. कारण वाॅर्ड आरक्षण तसेच रचना झाल्यानंतरच निर्णय घेणे योग्य ठरेल, असे यातील काहींनी म्हटले आहे.

इनकमिंग वाढेल
-सध्या आमच्याकडील इनकमिंग बंद झाले हे खरे आहे. आता वाॅर्ड रचना, आरक्षण जाहीर झाल्यानंतर ते पुन्हा सुरू होईल. भाजप हा देशातील सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे कार्यकर्ते इकडे येताहेत. ते येत राहतील.
भगवान घडामोडे, शहराध्यक्ष.
पुढील स्‍लाइडवर वाचा, -उमेदवारीसाठीच प्रवेशाची घाई