आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध शाळा, कॉलेज, संघटनांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरातील विविध शाळा, महाविद्यालय आणि सामाजिक संघटनांतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या वेळी विविध कार्यक्रमही घेण्यात आले. अनेकांनी भाषणांमधून बाबासाहेबांचे जीवनचरित्र मांडले.
ज्ञानप्रबोधिनी विद्यालय: या शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील घटनाक्रम सांगितला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेघा कुलकर्णी होत्या. प्रमुख पाहुणे कल्याण चव्हाण होते. विष्णू वाघ, शैलजा तांबोळी, जयश्री नेहरकर, संभाजी मोरे, सदानंद दहिहंडे, कैलाश जाधव, हरेश्वर माळी, मीना पेचफुले, शोभा करवंदे उपस्थित होते. भारती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू वाघ यांनी आभार मानले.

अमर हायस्कूल : येथील कार्यक्रमात अध्यक्षस्थानी मुख्यध्यापक चैत्राम बोरसे होते. वैशाली गायकवाड, अनुराधा चौधरी, अनिशा रत्नपारखे, शीतल आठवले, मीना पुरी, अफान शेख, रोहित खंडागळे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेश साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. अरविंद देशमुख यांनी आभार मानले.
भीमसिंह विद्यालय, शेवगा : अध्यक्षस्थानी बी. एन. फुंदे होते. बी. व्ही. साठे प्रमुख पाहुणे होते. एस. एच. जायभाये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी मार्गदर्शन केले. नंदगवळी यांनी मार्गदर्शन केले. एस. जी. गुठे यांनी सूत्रसंचालन केले.
प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा : अध्यक्षस्थानी वैजयंता मिसाळ होत्या. विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. व्ही. एम. कुंटे यांनी सूत्रसंचालन केले. ढमाले यांनी आभार मानले.

शिवतेज विद्यामंदिर : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक बाबासाहेब चव्हाण होते. चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी या वेळी आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन दीपक बैलम यांनी केल. काशिनाथ वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सारंगधर मोठे, नितीन सानप, गजानन गावंडे, सविता खरात यांनी परिश्रम घेतले.
जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद : जायंट्स ग्रुप ऑफ औरंगाबाद यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र पटेल होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रशासकीय संचालक डी. जी. चव्हाण यांची, शैलेंद्र विटोरे, शिवनाथ राठी, राजेंद्र धूत, विष्णू राऊत यांची उपस्थिती होती. या वेळी सर्व उपस्थितांनी आंबेडकरांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला

हेरंब प्राथमिक विद्यामंदिर :
सिडको एन-२ येथील अश्विनी बहुद्देशीय शैक्षणिक सेवाभावी संस्था संचलित हेरंब प्राथमिक विद्यामंदिर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. एड्समुक्त भारत अभियानाचे संस्थापक आदेश आहोटे, शाळेचे अध्यक्ष शैलेंद्र विटोरे, मीनाक्षी विटोरे, पूजा पर्हे यांची उपस्थिती होती. शाळेचे मुख्याध्यापक पी. जी. पवार उपस्थित होते.
जि. प. प्राथमिक शाळा, सातारा: कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कैलास ताडे, कुसुम तायडे, चित्रलेखा गोणारकर यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मंजुश्री राजगुरू होत्या. या वेळी संगीता तळेगावकर व कैलास ताठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वैशाली सोनवणे यांनी केले.
कर्मवीर बी. एस. पाटील विद्यालय : कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास कणखरे होते. वक्ता म्हणुन विलास चव्हाण होते. सूत्रसंचालन के. यू. गावंडे यांनी केले तर कणखरे यांनी कार्यक्रमाची सांगता केली.