आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप गेला, पाऊस आला, मराठवाड्यात दुष्काळ मात्र जैसे थेच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादमध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला. - Divya Marathi
औरंगाबादमध्ये सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला.
औरंगाबाद - मराठवाड्याच्या बहुतांश भागात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली. यामुळे जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याबाबत दिलासा मिळू शकेल, परंतु खरिपाचा हंगाम हातचा गेलेलाच आहे. दुष्काळाच्या प्रचलित व प्रस्तावित निकषांत या पावसाने कुठलीही भर पडणार नसल्याने दुष्काळ जैसे थेच राहणार आहे. यामुळे दुष्काळ घोषणेसाठी उपसमितीचा फार्स करण्याची गरज नसल्याचे मत उमटत आहे. यंदा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. पुढे दोन महिने ओढ दिली.आता पडणारा पाऊस खरिपाला फारसा उपयोगी नाही. विभागातील बीड, लातूर, उस्मानाबाद आणि परभणी जिल्ह्यांना सर्वाधिक फटका आहे.

उपसमिती तपासणार असलेले निकष व स्थिती
- निकष १ : जून, जुलैत ५०%पेक्षा कमी पाऊस.
वस्तुस्थिती : ८ जुलैअखेरपर्यंत सरासरीपेक्षा ३४% कमी पाऊस.

- निकष २ : सलग दोन आठवडे ओढ दिली, पिकांना फटका.
वस्तुस्थिती : जुलै, ऑगस्ट असे दोन महिने पावसाची दडी.
निकष ३ : संपूर्ण पावसाळ्यात ७५%पेक्षा कमी पाऊस पडणे.
वस्तुस्थिती : आठही जिल्ह्यांत आजवर सरासरीच्या ५०%ही नाही.

- निकष ४ : पाणीसाठा ०.४% किंवा त्यापेक्षा खाली असणे.
वस्तुस्थिती : सिद्धेश्वर, माजलगाव, मांजरा, निम्न तेरणा, सिना कोळेगाव प्रकल्पात ० % पाणीसाठा. जायकवाडी, येलदरी, मनार, विष्णुपुरीत ४ %पाणी.

- निकष ५ : एकूण लागवडीच्या तुलनेत ५०%पेक्षा कमी पेरणी.
वस्तुस्थिती : पावसाळ्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे औरंगाबाद विभागात १०२%, तर लातूर विभागात ९४.७ % पेरणी झाली.
पावसाची नक्षत्रे बाकी
गेल्या काही वर्षांतील पाऊसमान पाहता पूर्वा, उत्तरा, हस्त, चित्रा व स्वाती या नक्षत्रांत चांगला पाऊस झाला. सध्या पूर्वा नक्षत्र सूरू आहे. त्यानंतर रविवारपासून उत्तरा, २७पासून हस्त, ११ ऑक्टोबरपासून चित्रा, तर २४ पासून स्वाती नक्षत्र आहे.
चार दिवस पावसाचे
पुणे वेधशाळेनुसार ८ ते १२ सप्टेंबरदरम्यान मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणात चांगला पाऊस.