आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्याअभावी केळीच्या बागांसह पेरू, मोसंबी, संत्री आणि डाळिंबा सुकून चालल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोयगाव- तालुक्यात मागील १५ दिवसांतच विहिरी कोरड्याठाक पडत चालल्या आहेत. त्यामुळे फळबाग उत्पादकांसह बागायतदार शेतकरी चांगलाच हवालदिल झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यातच शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने लागवड केलेल्या केळीच्या बागांसह पेरू, मोसंबी, संत्री आणि डाळिंबाच्या बागा वाढत्या उन्हाच्या फटक्याने आणि पाण्याच्या दुर्भिक्षाने सुकून चालल्या आहेत. त्यामुळे फळ उत्पादक व बागायतदार शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाल्याचे दिसून येत आहे. त्यातच या बागांची कृषी विभागाच्या पथकाकडून बुधवारी (२६ एप्रिल) पाहणी करण्यात आली.
  
सोयगावला वाढत्या उन्हाच्या फटक्याने केळी बागांसह मोसंबीच्या बागा पूर्णतः जळून चालल्या आहेत. केळी बागांची सध्या कांदेबागेच्या उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी बागा ठेवल्या होत्या. परंतु सध्याचे सोयगावातील वाढते ऊन यामुळे कांदे बाग बहार यशस्वी झालेला नाही. काही दिवसांपूर्वी तळ गाठलेल्या विहिरी आता पूर्णपणे कोरड्याठाक झाल्या आहेत. वाढते ऊन आणि पाण्याचा अभाव यामुळे केळीच्या बागाच्या बागा सुकून चालल्या आहेत.
 
पीक विमा नसल्याने शेतकरी हवालदिल 
कृषी विभागाच्या हवामान आधारित पीक विम्यात केळी पिकाचा शासनाने समावेश केलेला नाही. मागील चार वर्षांपासून नैसर्गिक संकटांनी केळी पिकाचे मोठे नुकसान होत आहे. केळीचा पीक विम्यात समावेश करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरत आहे.
बातम्या आणखी आहेत...