आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप आमदार तारासिंग यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मुलुंड विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सरदार तारासिंग यांना विधीमंडळ सदस्य म्हणून अपात्र करण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ते सध्या दि नांदेड शिख गुरुद्वारा सचखंड श्री हुजूर अपचलनगर या गुरुद्वारा बोर्डाचे चेअरमन आहेत. सदर पद लाभाचे असल्याचा निर्वाळा हायकोर्टाने यापूर्वीच्या सुनावणीत दिला आहे. राज्य घटनेतील कलमानुसार विधीमंडळ सदस्याला लाभाचे पदे स्वीकारता येत नाही. त्यामुळे सदर याचिका दाखल करण्यात आली आहे. प्रकरणात गुरुवारी सुनावणी झाली असता न्या. आर. एम. बोर्डे न्या. के. एल. वडणे यांच्या खंडपीठाने सरदार तारासिंग यांच्यासह शासनाला कारणे दाखवा नोटीस बजावली.

राज्य घटनेच्या कलम १९१ (अ) नुसार महाराष्ट्र विधीमंडळाचा कोणताही सदस्य लाभाचे घेतल्यास अपात्र ठरतो. तरीही शासनाने तारासिंग यांची चेअरमनपदी नियुक्ती केली. त्यामुळे त्यांना आमदार म्हणून अपात्र ठरवावे यासाठी शासनाला निर्देश द्यावे म्हणून याचिका दाखल करण्यात आली आहे. बोर्डाचे सदस्य सरदार सुविंदरसिंग अजायबसिंग यांनी सदर याचिका दाखल केली आहे. तारासिंग, शासन, महसूल खात्याचे प्रधान सचिव, राज्य निवडणूक आयोग विधीमंडळ सचिवांना याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने प्रतिवाद्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. आॅगस्ट रोजी पुढील सुनावणी होईल. राज्य निवडणूक आयोगाकडून अॅड. महेश भारस्वाडकर, राज्य शासनाकडून अॅड. अतुल काळे यांनी काम पाहिले. तर याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. राजेंद्र देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना अॅड. अमोल जोशी, निर्मल दायमा, गोविंद कुलकर्णी, कुणाल काळे देवांग देशमुख यांनी सहकार्य केले.
बातम्या आणखी आहेत...