आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच कोटींची जास्त इंधन विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अौरंगाबाद - पेट्रोल पंपचालकांनी संप पुकारल्यामुळे सोमवारी वाहनधारकांनी पंपांवर रांगा लावल्या होत्या. संपाच्या धास्तीने अनेकांनी वाहनांच्या टाक्या फुल्ल केल्या. परिणामी दररोजपेक्षा अडीच कोटींचे जास्त पेट्रोल, डिझेलची विक्री झाली. दररोज औरंगाबादकर सुमारे तीन लाख िलटर पेट्रोल तर चार लाख लिटर डिझेलची खरेदी करतात. परंतु साेमवारी मात्र हा आकडा अनुक्रमे साडेचार लाख व सहा लाखांपर्यंत गेला. वाहनधारकांच्या गर्दीमुळे शहरातील ३६ पंपांपैकी २५ पंप ड्राय झाले. दरम्यान, रात्री आठच्या सुमारास टीव्हीवरील बातम्या पाहून औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनने संप मागे घेतला. मंगळवारी पंप सुरळीत सुरू राहतील, असे असाेसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांिगतले.
राज्यभरात पेट्राेलचा एकच दर असावा, मोठ्या शहरात इंधनावरील एलबीटी रद्द करावा, या मागणीसाठी राज्यभरातील पेट्रोल विक्रेत्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून बंदचा निर्णय घेतला होता. मात्र संप सुरू होण्याच्या अगोदरच आमदार विनोद तावडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रसििद्धमाध्यमांवरील बातम्या पाहून संप मागे घेतला. रात्री उशिरापर्यंत पंपचालकांनी अधिकचे टँकर मागवले होते.
शहराची स्थिती अशी
पेट्रोल
*३ लाख लिटर म्हणजेच ७८.४९ रुपयांप्रमाणे दोन कोटी ३५ लाख ४७ हजारांचे पेट्रोल दररोज लागते
*संपाच्या भीतीमुळे साडेचार लाख लिटर म्हणजेच ३ कोटी ३५ लाख २० हजार
५०० रुपयांचे पेट्रोल साेमवारी विकले गेले
डिझेल
*सुमारे ४ लाख लिटर डिझेल म्हणजे ६८ रुपये प्रतिलिटरप्रमाणे दोन कोटी ७२ लाख १२ हजारांचे डिझेल दररोज लागते.
*संपाच्या भीतीमुळे सहा लाख लिटर म्हणजेच दोन कोटी ८ लाख १८ हजारांच्या डिझेलची विक्री झाली
संप मागे
*पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राज्याचे अध्यक्ष उदय लोध यांच्याशी रात्री उशिरापर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो होऊ शकला नाही. टीव्हीवरील बातम्या प्रमाण मानून आम्ही संप मागे घेतला.
अखिल अब्बास, सचिव, पेट्रोल डीलर्स असोसिएशन, औरंगाबाद