आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईत जनतेला दिलासा, राज्यात पेट्रोल रुपयाने स्वस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पेट्रोल विक्रीवरील विविध करांत राज्य सरकारने कपात केल्याने राज्यात 1.12 रुपयांनी पेट्रोल स्वस्त झाले आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून केंद्राने 1.82 रुपयांची दरवाढ केली होती. व्हॅट, व्हॅट सेस व स्थानिक करांसह 2.47 रुपये एवढी ही वाढ होती. सोमवारी राज्याने काही करांचा भार कमी केला.

तथापि, स्थानानुसार दरात फरक पडू शकतो, असे जिल्हा पेट्रोल-डिझेल असोशिएशनचे सचिव अकिल अब्बास यांनी सांगितले. शहरी भागात पेट्रोलवर 26 टक्के व्हॅट, एक रुपया व्हॅट सेस आणि 1 टक्का एलबीटी आकारली जाते.