आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपचालक आज मध्यरात्रीपासून संपावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्यभरातएकाच दराने पेट्रोल, डिझेल मिळावे आणि मोठ्या शहरांमध्ये लावलेला एलबीटी रद्द करण्यात यावा या मागण्यांसाठी सोमवारच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल पंपचालकांनी बेमुदत संप पुकारला असल्याचे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष उदय लोध यांनी रविवारी जाहीर केले.

जनतेचा फायदा व्हावा यासाठी आम्ही हा संप पुकारला आहे. आमच्या मागण्या मान्य झाल्यास जनतेला पाच रुपये स्वस्त दरात पेट्रोल मिळेल. सध्या कुठल्याही राज्यात पेट्रोलवर एलबीटी आकारली जात नाही. पण महाराष्ट्र यास अपवाद असल्याचे लोध म्हणाले.
यांना सुविधा उपलब्ध
अग्निशमन,रुग्णवाहिका पोलिस वाहनांना इंधनाची सुविधा उपलब्ध असेल. संपात जिल्ह्यातील ११० पंप सहभागी होतील. हर्सूल टी पाॅइंट येथील कंपनीचे पंप सुरू राहतील.