आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
तरुणाईचे बाइकवर जिवापाड प्रेम असते. क्लास, मित्र-मैत्रिणींकडे जाण्यासाठी मोपेड, मोटारसायकल हवीच. मात्र आठवडाभरापूर्वीच झालेल्या पेट्रोलवाढीने तरुणांच्या पॉकेटमनीला कात्री लावली आहे.संपामुळे पेट्रोलसाठी पेट्रोपंपवर तासन्तास उभे राहावे लागत आहे. जास्तीच्या दरानेही पेट्रोल मिळणे दुरापास्त झाल्याने युवा वर्ग त्रस्त झाला आहे. त्यामुळे एरवी अगदी जवळच्या अंतरासाठी बाइकचा वापर करणारी तरुणाई आता पायी फिरणे आणि बस अथवा रिक्षाने क्लासला जाणेच बरे, असे म्हणू लागली आहे.
ग्राहकांना वेठीस धरू नये
गुरुवारी पेट्रोलदरवाढी विरोधात भारत बंद होता. या दिवशी पेट्रोलपंपाच्या मालकांनी भरपूर साठा केला. पेट्रोलचे दर वाढतील या आशेने पेट्रोलपंपमालक साठा करून ठेवत असल्याचे ऐकले आहे. पेट्रोलसाठी फरपट होत असल्याने आता जवळपास जाण्यासाठी पायी जाणेच पसंत करतो. पेट्रोलपंप मालकांनी ग्राहकांना वेठीस धरू नये. कारण दुचाकीमुळे अनेक कामे रखडतात.
-नदीम शेख, सहायक व्यवस्थापक, सुझुकी शोरूम
पर्याय निवडावा लागेल
पेट्रोल पंपावरील रांगा वाढतच आहेत. यावर उपाय कधी निघणार याची वाट पाहतोय. माझ्या बाइकच्या घशाला कोरड पडली आहे. किमान महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी तरी दरवाढ कमी होऊन पेट्रोलपुरवठा सुरळीत व्हावा. अन्यथा सिटी बस अथवा रिक्षाचा पर्याय निवडावा लागेल. पेट्रोलच्या दरवाढीमुळे पॉकेटमनीला कात्री लागणार हे निश्चित.
-गणेश गजरे, आयटी डिप्लोमा
गाडी ढकलत न्यावी लागली
रात्री पंपावर गर्दी कमी असेल, असा विचार करून तेथे गेलो तर पेट्रोलपंपच बंद असल्याने परत यावे लागले. यापूर्वी नेहमी रात्रीच पेट्रोल भरायला जायचो. पण गेल्या चार-पाच दिवासांपासून स्टॉक नसल्याने रात्री आठ वाजेपूर्वीच पेट्रोलपंप बंद होतात. बर्याच वेळा बाइक ढकलत घरी न्हावी लागते. आजही तेच करावे लागले.
संतोष सिंघल, बीएस्सी
दिवसात 7 वेळा परत
पेट्रोलवाढ जाहीर झाल्यापासून पेट्रोलपंपावर प्रचंड गर्दी वाढली. पेट्रोलपंपचालकांचा फायदाच आहे. आम्ही ग्राहक मात्र पेट्रोलच्या आगीत होरपळतोय. पेट्रोल साठवणूक करणार्या मालकांवर कारवाई व्हायला पाहिजेत. आठ दिवसांतून सात वेळा पेट्रोल न भरताच पंपावरून घरी परतावे लागले. आता बाइक सोयीची नव्हे तर ओझे वाटतेय.
-उमेश चवरे, बीएस्सी
बाइक टाळलेलीच बरीसुट्या असल्यामुळे क्रिकेट, डान्स, स्केटिंगचे क्लास लावले आहेत. पेट्रोल भरण्यासाठी बाहेर पडल्यानंतर पेट्रोलपंपावर लांबच लांब रांग असते. पेट्रोल भरून क्लासला बाइकवर जायचे म्हटले तर उशीर होतो. त्यामुळे आता बाइकचा मोह टाळलेलाच बरा, असे वाटू लागले.
-प्रणव शेंडगे, बीएस्सी
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.