आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल-डिझेलचा विक्रीकरामुळे भडका, औरंगाबादेत शुक्रवारपासून दरवाढ लागू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राज्य शासनाने पेट्रोल आणि डिझेलवरील विक्रीकर वाढवल्याने शहरात पेट्रोल 61 पैशांनी, तर डिझेल 1 रुपया 9 पैशांनी महाग झाले आहे. महागाईमुळे हैराण नागरिकांना हा नवा भुर्दंड आहे.
दरम्यान, कमिशन वाढवून मिळावे यासाठी डीलर असोसिएशनने रविवारपासून संपाचा इशारा दिला आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी वाढत्या तोट्याचे कारण पुढे करून गेल्या आठवड्यात जनतेवर लिटरमागे सुमारे साडेसात रुपयांची दरवाढ लादली होती. औरंगाबादेत हे दर 77 रुपये 83 पैशांवर पोहोचले होते. त्यात आता विक्रीकराची भर पडली आहे.