आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 लिटरमध्येे 150 एमएल पेट्रोल कमी आढळले, चुन्‍नीलाल पेट्रोल पंपावर चोरीचे माप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- आयसी (इंटिग्रेटेड सर्किट) वापरून पेट्रोल - डिझेलच्या मापात चोरी प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा, औरंगाबाद गुन्हे शाखा, संबंधित तज्ज्ञ आणि वैध वजन मापे प्रशासनाच्या सुमारे पंचवीस ते तीस कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी दोन वाजता चुन्नीलाल आसाराम पेट्रोल पंपाची  कसून तपासणी केली. तेथे आयसी सापडली नाही. पण सहा वेळा मोजणी केल्यावर पाच लिटरमागे १५० मिलिलिटर पेट्रोल, डिझेल कमी दिले जात असल्याची खळबळजनक बाब समोर आली. येथील पाच बूथच्या २२ नोझलची तपासणी पूर्ण झाल्यावर पथकाने पल्सर व कंट्रोल पॅनल किट जप्त केले.  दरम्यान, शहरातील सर्वच पंपांची तपासणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
 
पेट्रोल माप चोरी प्रकरणी ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी डोंबिवलीचा विवेक शेट्ये, पुण्याचा अविनाश नाईक यांना अटक केली होती. त्यांनी इंधनात माप मारणाऱ्या ४२ आयसी औरंगाबादमध्ये विकल्याची कबुली दिली होती. त्यानुसार ठाणे पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली.  पथकातील तंत्रज्ञाने बूथ उघडले. प्रथम वैध वजनमापे विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोजणीच्या मापात पाच लिटर पेट्रोल, डिझेल टाकायला सांगितले. तेव्हा ५५ एमएल इंधन कमी भरले. सहा वेळा अशी तपासणी केल्यावर १५० मिलिलिटर कमी इंधन दिले जात असल्याचे स्पष्ट झाले.
 
यांचा होता कारवाईत समावेश: औरंगाबाद गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक नंदकुमार भंडारी, ठाणे गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास घोडके, उपनिरीक्षक अविनाश महाजन, शिवराज बेंद्रे, हेड कॉन्स्टेबल अंकुश भोसले, सुरेश यादव, प्रशांत भुर्के, संतोष सुर्वे, वजनमापे विभागाचे निरीक्षक ए. एस. कुलकर्णी, शिवहरी मुंडे, अशोक शिंदे, सहायक निरीक्षक डी. के. तांदळे.
 
आजच कसे आढळले?  
वजनमापे विभागाने आम्हाला दिलेल्या मापामध्येच संशय आहे. दरवर्षी आमच्याकडील मोजमाप साहित्याची हाच विभाग तपासणी करून आम्हाला ना हरकत प्रमाणपत्र देतो. मग आजच त्या मापातून इंधन कमी जात असल्याचे कसे आढळले, असा सवाल चुन्नीलाल पंपाच्या मालकांनी केला.   

असा आला प्रकार समोर: बूथच्या नोझलमध्ये ‘पल्सर’ नावाच्या पार्टमध्ये कंपनीचे मूळ सील तोडून त्यात आयसी (इंटिग्रेटेड सर्किट) पार्ट बसवली जाते. ती आतील वितरण यंत्रणेवर नियंत्रण मिळवून तिला निर्धारित करून दिलेलेच इंधन पुढे पाठवते. या क्षेत्रात जाणकारच आयसीची प्रोग्रामिंग करू शकतात. त्यामुळे वाहनचालकांना वितरित होत असलेेल्या इंधनात प्रत्येक लिटरमागे ठराविक इंधन कमी जाते. ठाण्यामध्ये सील करण्यात आलेल्या पेट्रोल पंपावर प्रत्येक ५ लिटरमागे २०० एमएल इतक्या पेट्रोलची चोरी उघड झाली. चुन्नीलाल पंपावर ती १५० एमएल निघाली.  

कंपनीने बूथमध्ये लावलेले सील तोडून बसवली जाते आयसी
औरंगाबादेत सुमारे ४२ आयसी विकल्या गेल्या. त्यातील काही आयसी पंप चालकांनी बसवल्याची माहिती ठाणे पोलिसांना मिळाली होती. शुक्रवारी झालेल्या कारवाईमुळे इतर पंपचालक आयसी काढून टाकतील ना, असा प्रश्न पथकातील एका अधिकाऱ्याला विचारला. तेव्हा त्याने सांगितले की, आयसी बसवणे जितके अवघड त्यापेक्षा ती काढणे अधिक अवघड अाहे. आयसी काढण्यासाठीही जाणकार व्यक्तीच लागतो. तसेच आयसी बसवताना कंपनीचे मूळ सील तोडून ती कंट्रोल पॅनेलमध्ये बसवली जाते. त्यामुळे आयसी काढली तरी ते बूथ उघडताच लक्षात येते.
 
हेही वाचा,
बातम्या आणखी आहेत...