आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरदारांचे ‘भविष्य’ जपणारे पीएफ ऑफिस, येथे राहतो तुमचा भविष्य निर्वाह निधी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नोकरदारांच्या मासिक वेतनातून कपात होणारी रक्कम म्हणजे पीएफ. निवृत्तीनंतर आर्थिक आधार मिळावा या हेतूने पीएफ पेन्शनची योजना अमलात आली. त्यामुळे खासगी क्षेत्रातील सर्वच तसेच तर काही सरकारी कर्मचाऱ्यांचा या कार्यालयाशी संपर्क येतो. जाणून घेऊया या कार्यालयातील कामाची पद्धत, कार्यालयीन रचना इतर बाबी…
असे आहे कार्यालयाचे काम
भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफचे औरंगाबादमध्ये क्षेत्रीय कार्यालय आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांसाठी हे कार्यालय काम करते. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र अथवा राज्य शासनाकडून पीएफ पेन्शनचा लाभ मिळतो त्यांचा या कार्यालयाशी संबंध येत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये आऊटसोर्सिंगद्वारे काम करणारे कर्मचारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्यासह खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सर्वच ग्रेडच्या कर्मचाऱ्यांचा पीएफ, पेन्शन फंडची रक्कम या कार्यालयाकडे प्रत्येक महिन्याला जमा होत असते. संंबंधित संस्था, कंपनी, कार्यालयाकडून ही रक्कम जमा करवून घेण्याचे काम पीएफ कार्यालय करते. त्यावर केंद्र सरकारने ठरवून दिलेले व्याज चक्रवाढ पद्धतीने लावले जाते. तसेच नोकरीत असताना विविध कारणांसाठी अॅडव्हान्स घेणे, नोकरी सोडल्यानंतर अथवा निवृत्तीनंतर विड्रॉल करणे, पेन्शन देणे, नोकरीच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास विम्यापोटी वारसांना निर्धारित रक्कम देण्याचेही काम या कार्यालयाकडून केले जाते. शिवाय ज्या कंपन्या, संस्था, कार्यालये कर्मचाऱ्यांचा पीएफ प्रत्येक महिन्याला भरत नाहीत त्यांच्यावर कारवाई करणे हे देखील महत्त्वाचे काम येथे चालते.

इन्शुरन्सची प्रक्रिया
प्रत्यक्ष ड्यूटीवर असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वारसांना पीएफकडून इन्शुरन्सदेखील मिळतो. मृत्यू झाला त्या वेळी असेलेले वेतन, सेवेच्या कालावधीवरून इन्शुरन्सची रक्कम ठरते. फॉर्म (IF) पीएफ कार्यालयाकडून घेऊन सर्व कागदपत्रांसह तो कार्यालयातच जमा करणे.
पीएफकार्यालयाशी संपर्कासाठी पत्ता : क्षेत्रीयभविष्य निधी संघटन कार्यालय, सिडको बसस्थानकाच्या मागे, एन-१, सिडको, औरंगाबाद

दूरध्वनी: ०२४०-२४८७१५७संकेतस्थळ: www.epfindia.gov.in, www.epfindia.nic.in
ई-मेल : sro.aurangabad@epfindia.gov.in

कसा काढाल पीएफ?
नोकरीत असतानाही विविध कारणांसाठी पीएफची रक्कम काढता येते. त्याला अॅडव्हान्स म्हणतात. स्वत:सह पाल्याचे लग्न, शिक्षण, घर बांधकाम, गृहखरेदी, कर्जाची परतफेड, वैद्यकीय खर्चासाठी पीएफ अॅडव्हान्स घेता येतो. अर्थात, कारणाचा स्पष्ट पुरावा आवश्यक असतो. पीएफ कार्यालयात फाॅर्म १९ आहे, तो भरून त्यासोबत कारणाचा पुरावा बँक पासबुकची झेरॉक्स जोडून तो आवक विभागात पोस्टाद्वारे अथवा स्वत: आणून देणे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करून २० दिवसांमध्ये पीएफ कार्यालय तुमच्या बँक खात्यावर अॅडव्हान्सची रक्कम जमा करते.