आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PH D Entrans Test PET Result On Website Dr.babasaheb Ambedkar University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट-2 चा निकाल संकेतस्थळावर जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गाजलेल्या दुसर्‍या पेट परीक्षेचा ऑनलाइन निकाल बुधवारी जाहीर झाला. परीक्षेचा विषयनिहाय निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आल्याचे बीसीयूडीचे संचालक डॉ. एम.एस.शिनगारे यांनी सांगितले. मात्र रात्री उशिरापर्यंत संकेतस्थळावर निकाल उपलब्ध झाला नव्हता. पुढील पेट परीक्षेच्या नोंदणीची तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचेही डॉ.शिनगारे म्हणाले. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक पेपरमध्ये कमीत कमी 50 गुण मिळणे आवश्यक आहे. तर अनुसूचित जाती-जमाती व अपंग विद्यार्थ्यांना प्रत्येकी 45 गुण मिळणे आवश्यक आहे. 9 डिसेंबर 2012 रोजी 6 हजार 485 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या निकालामुळे संशोधनाचा मार्ग मोकळा झाला असला तरी मार्गदर्शक केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.