आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PH D Issue At Dr.babasaheb Ambedkar Marathwada University Aurangabad

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या पीएचडीचा मार्ग आता मोकळा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माधव फड यांच्या ‘गोपीनाथ मुंडे यांची सामाजिक न्यायातील भूमिका’ या पीएचडी विषयाला मंजुरी दिल्यामुळे 11 जुलै 2009 पूर्वी नोंदणी झालेल्या पीएचडी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचाही प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व विद्यार्थ्यांचे सादरीकरण करून घेण्यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शनिवारी परिपत्रक जारी केले.

माधव फड यांच्याप्रमाणे 250 विद्यार्थ्यांची प्रलंबित पीएचडी प्रकरणेही मार्गी लावावीत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे यांच्याकडे केली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने पेट (पीएचडी एंट्रन्स टेस्ट) परीक्षा लागू करण्यापूर्वी म्हणजेच 11 जुलै 2009 पूर्वी ज्यांचे आरआरसी (संशोधन मान्यता समिती) मध्ये पीएचडी विषय मंजूर झालेले आहेत, मात्र सादरीकरण झालेले नाही, त्यांना काही अटी व शर्तीनुसार पीएचडी प्रवेश देण्याचे ठरवले आहे. बीसीयूडी संचालक डॉ. मुरलीधर शिनगारे यांनी यासंदर्भात निर्णय घेतला आहे. 1 फेब्रुवारीला स्वाक्षरी करून त्यांनी 2 फेब्रुवारीला हे परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे माधव फड यांच्याप्रमाणे 2009 ला आरआरसी झालेल्या विद्यार्थ्यांचा पीएचडी संशोधन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनासाठी विषयनिहाय वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

तीन दिवसांची मुदत
2009 पूर्वीच्या आरआरसीत विषय मंजूर पण विषयाचे सादरीकरण झालेले नाही, विद्यापीठातील आरआरसीच्या अभिलेखात त्यांचा उत्तीर्ण म्हणून उल्लेख असावा, तीन दिवसांत पीएचडी विभागाशी संपर्क करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यानंतर दखल घेतली जाणार नाही. आरआरसीच्या बैठका झाल्यानंतर पुन्हा किंवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नसल्याचेही डॉ. शिनगारे यांनी स्पष्ट केले आहे.