आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तू ही रे... अन् जीव रंगला... हरिहरन यांच्या \'स्वरझंकार\'ने औरंगाबादकर मंत्रमुग्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दिव्य मराठी आयोजित स्वरझंकार महोत्सवात विख्यात गायक हरिहरन यांनी औरंगाबादकरांना मंत्रमुग्ध केले. काल (रविवारी) सायंकाळी प्रोझोनच्या प्रांगणात झालेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्ट ऐकण्यासाठी रसिकांनी तोबा गर्दी केली होती.

‘मरीजे इश्क का क्या है, जिया जिया जिया
बस एक साँस का झगडा है, लिया लिया लिया
मेरे ही नाम पे, आया है जाम महफिल मे
ये और बात है के मैंने पिया पिया पिया.....’

अशा हृदयाचा अचूक ठाव घेणाऱ्या गझलांसह ‘तू ही रे तू ही रे तेरे बिना मैं...’ या गाण्यांची जादुई मैफल औरंगाबादकर रसिकांना कैद करणारी ठरली. रविवारी (12 नोव्हेंबर) प्रोझोनच्या प्रांगणात दिव्य मराठी आयोजित स्वरझंकार महोत्सवाने अक्षरश: स्तब्ध केले. गुलाबी थंडीच्या साक्षीने चढत गेलेला स्वरांचा उबदार साज रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरला. जगविख्यात गायक हरि हरन यांचा हा लाइव्ह कॉन्सर्ट संस्मरणीय झाला.

आपल्या अनोख्या शैलीने संगीतविश्वासह बॉलीवूडकरांचे लक्ष वेधणाऱ्या हरिहरन यांना लाइव्ह ऐकण्यासाठी औरंगाबादकरांनी गर्दी केली होती. वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी 5.30 पासूनच रसिकांनी कार्यक्रमस्थळी जमण्यास सुरुवात केली. गझल अन् शास्त्रीय गायकीच्या दर्दी रसिकांसह आजच्या पिढीतील बॉलीवूड गाण्यांच्या चाहत्यांनीही या कॉन्सर्टला तितकाच उदंड प्रतिसाद दिला. जागतिक उंचीवर असूनही रसिकांशी संवाद साधत स्वरांची संगत करणाऱ्या हरिहरन यांनी आपल्या शैलीने रसिकांना जिंकले.

‘जीव रंगला’चा मराठमोळा साज
जीव रंगला दंगला.... या मराठमोळ्या गाण्याने शेवटाकडे गेलेली मैफल अधिक रंगतदार झाली. बॉम्बेचे ‘तू ही रे तू ही रे’ ही फर्माईश दिल खुश करणारी झाली. रसिकांची अप्रतिम फर्माईश आणि ती तितक्याच साधेपणाने पूर्ण करण्याचे त्यांचे मोठेपण हेदेखील सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. अशातच एक लहानगा स्वरमंचाकडे धावला अन् ‘रोजा’ गाण्यास भाग पाडले. हरिहरन यांनीही तेवढ्याच मोठेपणाने त्याला प्रतिसाद दिला.

काळा कुर्ता, कानात भिकबाळी... हरीहरन यांचा खास अंदाज
काळा कुर्ता, कानात भिकबाळी अन् खास अंदाजातील पोशाखात स्वरमंचावर आलेल्या हरिहरन यांना पाहताच रसिकांतून एकच जल्लोष झाला. औपचारिकता आटोपताच क्षणाचाही विलंब लावता त्यांनी गाण्याला सुरुवात केली. खर्जातून तार सप्तकापर्यंत जाणारा त्यांचा आवाज, आरोह-अवरोहांशी ते करत असलेली नजाकत अन् आवर्तने घेत समेवर पोहोचण्याचे त्यांचे कौशल्य हृदय काबीज करणारे होते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... हरिहरन यांच्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...