आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Photos Of Drought Affected Marathwada Click By Photographer

40 वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ, फोटोग्राफरने मांडल्या वेदना, असे जगताहेत लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे आहे लातूरच्या महाकांत माळी या शेतकऱ्याचे कुटुंब. माळी यांनी काही दिवसांपूर्वी शेतात आत्महत्या केली होती. - Divya Marathi
हे आहे लातूरच्या महाकांत माळी या शेतकऱ्याचे कुटुंब. माळी यांनी काही दिवसांपूर्वी शेतात आत्महत्या केली होती.
मुंबई - महाराष्ट्रातील अनेक जिल्हे सध्या दुष्काळाच्या कटाच्यात आले आहे. गेल्या 40 वर्षांतील हा सर्वात भीषण दुष्काळ असल्याचे सांगण्यात येत आहे. मराठवाड्यात तर तलाव, नद्या, नाले, विहिरी सर्व ठिकाणचे पाणी पूर्णपणे संपले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये पारा 45 अंशावर पोहोचला आहे. उष्माघाताने अनेकांचा बळी गेल्याच्या बातम्या येत आहेत. फोटो जर्नालिस्ट निखिल ईनामदार यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात या दुष्काळाची दाहकता टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्रातील स्थिती..
- निखिल इनामदार त्यांच्या भावाबरोबर मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले होते. या दरम्यान त्यांनी अनेक गावांमध्ये फोटो क्लिक केले.
- मराठवाड्यातील भीषणता दर्शवणारे सर्वाधिक फोटो ब्लॅक अँड व्हाइट आहेत.
- महाराष्ट्राच्या 34 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. सर्वाधिक परिणाम मराठवाड्यात दिसून येत आहे.
- लातूर आणि परभणीमध्ये तर पाण्यासाठी 144 कलम लावण्यात आले आहे.
- मराठवाड्याच्या अनेक तलावांत, धरणांत 4 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. लातुरात रेल्वेने लाखो लीटर पाणी पोहोचवले जात आहे.
- महाराष्ट्रात 2016 मध्ये महिन्याला सरासरी 90 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

7 मोठ्या धरणांतील पाणी संपले..
- महाराष्ट्रातील 11 मोठ्या धरणांपैकी 7 धरणांमधील पाणीसाठी संपला आहे. एका सरकारी आकडेवारमध्ये याबाबतची माहिती समोर आली आहे.
- जलसंपदा विभागाकडून 15 एप्रिलला जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार दुष्काळग्रस्त मराठवाड्यात 814 मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन योजनांमध्ये केवळ 3 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
- मराठवाड्याच्या सात मोठ्या धरणांतील पाणीसाठी तर पूर्णपणे संपला आहे.
- त्यात जायकावाडी, सिद्धेश्वर, माजलगांव, मांजरा, निम्न तेरणा, मन्नार आणि सिना कोळेगावचा समावेश आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दुष्काळाची दाहकता आणि त्यात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील जनतेचे काही PHOTOS