आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्राने केले मित्राच्या बहिणीचे फोटो फेसबुकवर अपलोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद-मित्राशी झालेल्या वैचारिक मतभेदातून बीड येथील उच्चशिक्षित युवकाने चक्क त्याचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून मित्राच्या बहिणीचे अश्लील फोटो अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. सायबर क्राइमने बीड येथील एमएस्सी कॉम्प्युटरचे शिक्षण घेणार्‍या सुनील सोनुजी गायकवाड (रा. बार्शी नाका) याला अटक केली आहे.

बीड येथे सोबत शिक्षण घेताना सुनील गायकवाड याचे त्याचा मित्र विश्वासशी (नाव बदलले आहे.) भांडण झाले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी विश्वास छावणी परिसरातील एका महाविद्यालयात शिक्षणासाठी आला. तसेच तेथील वसतिगृहात तो सध्या राहतो. गेल्या दोन महिन्यांपूर्वी गायकवाडने विश्वासचे बनावट फेसबुक अकाउंट उघडले. त्यावर त्याच्या बहिणीचे अश्लील फोटो अपलोड केले.

याबाबतची तक्रार विश्वासने सायबर क्राइमकडे केली. दोन महिने शोध घेतल्यानंतर सोमवारी सायबर क्राइमचे निरीक्षक गौतम पातारे, रवी खरात, गणेश वैराळकर, रेवन गवळे, धुडकू खरे, सुधीर गायकवाड, बाळू राठोड आणि जयर्शी पाटील यांनी गायकवाडला बीड येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध आयटी अँक्टनुसार छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.