आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Phulabri Constituency,latest News In Divya Marathi

तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध : अनुराधा चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-फुलब्री मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण यांनी सांगितले. सुलतानपूर, वरूड काझी, शेंद्राबन, वडखा, वरझडी, बनगाव, कुबेर गेवराई, जयपूर, कुंभेफळ, टोणगाव, करमाड, गोलटगाव येथे त्यांनी सभा घेतल्या.
ज्यांना दहा वर्षे संधी देऊनदेखील या मतदारसंघाचे प्रश्न सोडवता आले नाही ते आगामी काळात या मतदारसंघाचा काय विकास करणार. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा चव्हाण यांना एक संधी देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रमुख तांगडे पाटील, अंभोरे मामा उपस्थित होते. दरम्यान खा. सुप्रिया सुळे शहरात आल्या असता अनुराधा चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली.