आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवृत्त जजकडून लाच घेताना ‘पीआय’ अटकेत; डॉक्टर मित्रही पकडला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एका गुन्ह्यातील आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी मदत केली म्हणून त्या गुन्ह्यातच आरोपी करण्याचे धमकी देत निवृत्त न्यायाधीशांकडून 35 हजारांची लाच मागणारा एक पोलिस निरीक्षक व त्याच्या डॉक्टर मित्राला अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले.
मालेगावच्या आझादनगरात राहणारे शेख शहेजाद, शेख शाहबाज आणि शेख अबरार यांच्याविरुध्द जून 2012 मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींनी वापरलेली कार निवृत्त न्यायाधीश राजेश रतनलाल काळे (रा. छावणी) यांच्या घरासमोर उभी करण्यात आली होती. ही कार तुम्ही वापरली तसेच आरोपींना अटकपूर्व जामिनासाठी मदत केली असे म्हणत काळे यांना सहआरोपी करण्याची धमकी देत नाशिक ग्रामीणच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलिस निरीक्षक गौतम अण्णासाहेब गायकवाड याने दोन लाखांची मागणी केली होती. जून 2012 पासून तो पैसे मागत होता.
यातील पहिला हप्ता म्हणून 35 हजार रुपये घेण्यासाठी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास गायकवाड आणि त्याचा मित्र डॉ. पे्रमसरोज भन्साळी जिल्हा-सत्र न्यायालयाच्या मागे क्रांतीनगरात अ‍ॅड. काळे यांच्या कार्यालयात आले. तेथे डॉ. भन्साळीने 35 हजार रुपये स्विकारले. याचवेळी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोचे पोलिस उपअधीक्षक बाबाराव मुसळे, कैलास प्रजापती, सहायक फौजदार लक्ष्मीकांत खडके यांच्यासह पथकातील कर्मचाºयांनी छापा मारत दोघांना रंगेहाथ पकडले.