आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pimpriraja Robbery, One Lakh Rupees Ornaments ,possession Of The Accused

पिंप्रीराजात दरोडा; सव्वा लाखाचा एेवज लंपास, संशयित ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - औरंगाबाद तालुक्यातील पिंप्रीराजा येथे दरोडेखोरांनी घराचे चॅनल गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून घरातील एक लाख २७ हजार ८८२ रुपयांचे दागिने लंपास केले. शनिवारी (११ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास ज्ञानेश्वर शेळके (रा. पळशी, ह. मु. पिंप्रीराजा) यांच्या घरी ही चोरी झाली. श्वानाने काढलेल्या मागावरून करमाड पोलिसांनी एकाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. ज्ञानेश्वर शेळके हे आपल्या कुटुंबीयांसमवेत शनिवारी घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी चॅनल गेट तोडून किचनरूममधून घरात प्रवेश केला. त्यानंतर लोखंडी पेटीतील सोन्याचे गंठण व नेकलेस असे एक लाख २७ हजार ८८२ रुपयांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी ज्ञानेश्वर शेळके याने करमाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

फिर्यादीवरून पोलिस श्वानासह घटनास्थळी दाखल झाले. रविवारी श्वानपथक व फिंगर प्रिंट्सतज्ज्ञांनी घटनास्थळी चोरीचा माग काढण्याचा प्रयत्न केला. श्वासनाने भावकीतीलच प्रवीण अण्णा शेळके यांच्या घरापर्यंत माग काढला. त्यामुळे
पोलिसांनी संशयित म्हणून प्रवीण यास ताब्यात घेतले. याप्रकरणी करमाड पोलिस पुढील तपास करीत आहे.