आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंग पाँग जुगार अड्डय़ावर छापा; आठ जण अटकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - इंदिरानगर (मुकुंदवाडी) भाजी मार्केट परिसरात सुरू असलेल्या ‘पिंग पाँग’ या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या जुगार अड्डय़ावर मुकुंदवाडी पोलिसांनी सोमवारी (18 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता छापा टाकला. यात आठ जणांना पकडण्यात आले असून पिंग पाँगच्या पाच मशीनही जप्त करण्यात आल्या आहेत.

जालना येथील एम.जी. रोड परिसरातील रहिवासी गणेश रामचंद्र भगत (33) हा काउंटरवर बसलेला पोलिसांना आढळला. हा खेळाचा प्रकार नसून जुगारच असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी दुकानातील प्रत्येकी पंधरा हजार रुपये किमतीच्या पाच पिंग पाँग मशीन हस्तगत केल्या. शिवाय तीन बॅगमध्ये पंधरा हजारांचे कॉइन्स आणि जुगार खेळणार्‍या सात जणांना ताब्यात घेतले. त्यात सचिन राऊत्रे (19, रा. शहाबाजार), भगवान गणपत वाघमारे (48), विजू दयानंद पाखरे (32, रा. संतोषीमातानगर), विलास प्रकाश गायकवाड (29, रा. अंबिकानगर), विनोद भीमराव कांबळे (24), बापूराव भाऊराव देशमुख (57) आणि सचिन उत्तमराव वाहुळे आदींचा त्यामध्ये समावेश आहे. जुगार्‍यांवर मुंबई जुगार कायद्याचे कलम 12 (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक महेश आंधळे, दत्ता गढेकर, विठ्ठल फरताळे, परशुराम सोनुने आणि शेख गनी शेख भिकन आदींच्या पथकाने ही कारवाई केली.