आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आराखड्यात पिसादेवीच्या रस्त्याची रुंदी निम्म्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जळगाव रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पिसादेवीकडे जाणारा रस्ता २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९९१ च्या विकास आराखड्यात ४५ मीटरचा दाखवण्यात आला होता. अलीकडे या भागात मोठ्या प्रमाणावर बांधकामे झाल्याने हा रस्ता अरुंद होतो की काय अशी चिंता अनेकांनी पडली होती. त्यामुळे विकास आराखड्यात या रस्त्याची रुंदी वाढवणे शक्य नसले तरी तो रस्ता आहे तसाच राहील, असे अपेक्षित होते. परंतु पालिका पदाधिकाऱ्यांनी या रस्त्याची रुंदी २४ मीटरवर आणली आहे.
विशेष म्हणजे उपसंचालक रझा खान यांनी या रस्त्याची रुंदी ४५ मीटर एवढीच ठेवली होती. मात्र, पदाधिकाऱ्यांनी ही रुंदी कमी करून अनेकांची सोय करून दिल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.

मानके काय म्हणतात?
१९८९च्या नियोजन मानकांनुसार हजार लोकसंख्येला ०.२ हेक्टर उद्यान तसेच मोकळ्या मैदानासाठी आरक्षित असणे गरजेचे आहे. या परिसरातील लोकसंख्येचा विचार केला असता ४३ हेक्टर जागा या कामासाठी आरक्षित असणे अनिवार्य आहे.

खान यांनी विद्यमान उद्यानांसह ३७.३९ हेक्टर क्षेत्र उद्यान तसेच मैदानासाठी ठेवले होते. १८ जागांवर हे आरक्षण टाकण्यात आले होते. हर्सूल तलावाला लागून असलेले स्मृती उद्यान हे ६.७५ हेक्टरवर पसरले आहे. याचा या क्षेत्रात समावेश आहे. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकारात १८.८९ हेक्टरवरील ही आरक्षणे उठवून या जागा रहिवासी वापरासाठी मोकळ्या केल्या. हे करताना २०३६ च्या लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला नाही. मानकानुसार आरक्षण असावे म्हणून हर्सूल तसेच सावंगी तलावाच्या पाणलोट क्षेत्रात उद्याने ठेवण्यात आली आहेत. दाखवायला उद्याने असली तरी ती प्रत्यक्षात नागरिकांच्या उपयोगाची असणार नाहीत याचीही खबरदारी त्यांनी घेतली.

एकाच उद्यानात जागा भरली
रझाखान यांनी १८ जागांवर आरक्षण ठेवले होते. पालिका पदाधिकाऱ्यांनी ही संख्या १२ इतकी कमी केली. क्षेत्रफळाचा विचार करता खान यांनी ३७ हेक्टर इतकी जागा ठेवली होती. पालिका पदाधिकाऱ्यांनी खेळी खेळताना ८२.१८ हेक्टर एवढी जागा उद्याने तसेच मैदानांसाठी ठेवण्याची किमया केली. हा चमत्कार कसा घडला, असा प्रश्न प्रत्येकालाच पडेल, तर त्याचे उत्तर असे आहे. यातील एकच उद्यान ४७.२० हेक्टरचे ठेवण्यात आले आहे. निम्मी जागा एकाच उद्यानात त्यांनी समाविष्ट केली. हे उद्यान हर्सूल तलावाला लागून असलेल्या स्मृती उद्यानाच्या बाजूला आहे. अर्थात, ही जागा पाणलोट क्षेत्रात येते.

याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले आहे. एकाच ठिकाणचे हे उद्यान कमी केले तर फक्त २८.२२ हेक्टर जागा शिल्लक राहते. ती मानकांच्या खूप कमी आहे. मात्र, अभ्यासकांना दाखवण्यासाठी जास्तीचा जागा नकाशात दिसते. प्रत्यक्षात पाणलोट क्षेत्रात उद्यान होणे अशक्य आहे. भविष्यात जर हर्सूल तलाव भरून वाहू लागला तर उद्यानासाठी सध्या आरक्षित करण्यात आलेली सर्व जागा ही पाण्याखाली असेल याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.