आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे बुजवण्यासाठी कदमांनी दिला दिवसांचा 8 अल्टिमेटम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्त्यांची कामे करणारे ठेकेदार तसेच अधिकाऱ्यांना शहरातील खड्डे बुजवण्यासाठी पालकमंत्री रामदास कदम यांनी दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. ज्या ठेकेदारांनी रस्त्याची कामे केली आहेत त्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम त्यांचेच आहे. त्यांनी आपले शहर समजून दिवसांत ते बुजवावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी तंबी ठेकेदारांना दिली.
खड्डे प्रकरणात केवळ अधिकारीच नाहीत, तर ठेकेदारांवरही कारवाई होऊ शकते. तशी कारवाई करण्याची आमची इच्छा नाही अन् ती वेळ ठेकेदारांनी येऊ देऊ नये. खड्ड्यांचे काय झाले, याचा दिवसांनंतर आढावा घेतला जाईल. तोपर्यंत खड्डे बुजवले गेले पाहिजेत, असा इशाराच त्यांनी दिला. सुभेदारी विश्रामगृहावर झालेल्या बैठकीस खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते राजेंद्र जंजाळ, जिल्हाधिकारी निधी पांडे, आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.

भिकाऱ्यासारखेकटोरे घेऊन फिरता, वसुली का करत नाहीत? : मनपाचीवसुली टक्के असल्याचे बैठकीत पालकमंत्र्यांना सांगण्यात आले. त्यामुळे कदम कमालीचे चिडले. प्रत्येक वेळी तुम्ही भिकाऱ्यासारखे कटोरे घेऊन फिरता. आम्हाला पैसे द्या, अशी तुमची ओरड असते. तुम्ही वसुलीच करत नाहीत. तुमचे काम तुम्ही करत नाहीत तेव्हा तुम्हाला कोण पैसे देईल, असा सवाल त्यांनी केला. शासनाकडून देण्यात आलेल्या पैशातूनही कामे होत नाहीत ही बाब मुख्यमंत्र्यांना समजली तर ते तुम्हाला पुन्हा कशाला पैसे देतील, असेही कदम यांनी सांगितले.
बैठकीत पालकमंत्री कदम यांच्याशी चर्चा करताना आमदार अब्दुल सत्तार.

कटकट गेट वळण रस्त्यासाठी ६० लाख
कटकट गेटमधून जाणारा मार्ग बंद करून वळण रस्ता करण्यासाठी शासनाकडून पालिकेला ५० लाख रुपये देण्यात आले होते, परंतु त्याचा वापर झाला नाही. त्यासाठी आणखी निधीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता कोटी १० लाख रुपये यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तेथील अतिक्रमण काढून वळण रस्ता तयार करण्यात यावा.

खांब हटवण्यासाठी कोटी लवकरच
विद्युत कंपनीचे रस्त्यावरील खांब हटवण्याची मागणी पालिकेने केली होती, परंतु मंडळाने त्यास नकार दिला. त्यासाठी येणारा कोटी रुपयांचा खर्च पालिकेने करावा, अशी मंडळाची मागणी होती. ही रक्कम देण्यास पालिका राजी नव्हती. परंतु हे कोटी रुपये शासनाकडून मंडळाला दिले जातील, असे कदम यांनी स्पष्ट केले.

आयआयटी पवईकडून थर्ड पार्टी इन्स्पेक्शन
कोट्यवधी रुपये खर्चून रस्त्यांची कामे सुरू आहेत तरीही खड्डे कसे काय पडतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पवई येथील आयआयटीकडून रस्त्यांच्या कामाचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याचे आदेश त्यांनी दिले. गत दोन वर्षांत किती रस्त्यांची कामे झाली, त्यातील किती खराब झाले, ठेकेदारांना किती बिले देण्यात आली याचा अहवाल दिवसांत देण्याचे आदेश दिले.

शहर तुमचेही आहे
ज्या रस्त्यांची कामे केली त्याच रस्त्यावर खड्डे पडले असतील तर ते बुजवण्याचे काम ठेकेदारांचेच आहे, असे कदम यांनी सांगितले. ‘ठेकेदारांनो, हे शहर तुमचेही आहे. आपले शहर समजून खड्डे बुजवा, अन्यथा आम्हाला कठोर कारवाई करावी लागेल. तसे करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, अशी तंबी त्यांनी ठेकेदारांना दिली.
बातम्या आणखी आहेत...