आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Planning To Start Night Life In Aurangabad City Like Mumbai

मुंबईच्या धर्तीवर पर्यटन राजधानी औरंगाबादमध्ये "नाइट कल्चर' सुरू करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेतील पर्यटन वाढावे आणि पर्यटकांची व्यवस्था व्हावी यासाठी येथेही हॉटेल्स आणि बार रात्रभर सुरू ठेवण्याचा विचार होऊ शकतो.
मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी मुंबईत बार, पब रात्रभर सुरू राहावेत, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरातही हा निर्णय लागू होऊ शकतो का यावर बार, हॉटेलचालक विचार करत आहेत. तर पोलिसांनीही अभ्यास सुरू केला.
शहरात सुमारे ३०० हॉटेल्स आहेत. यापैकी पंचतारांकित असलेल्या पाच ते सहा हॉटेलमध्ये रात्रभर सेवा सुरू असते. त्यामुळे सामान्य प्रवासी आणि पर्यटक रात्री उशिरा शहरात आल्यास त्यांची गैरसोय होते. हॉटेल आणि बारबरोबर मेडिकल, दूध आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दुकानेही २४ तास सुरू राहावीत, असा प्रस्ताव समोर येत आहे.
औरंगाबादची ऐतिहासिक ओळख आणि राज्याची पर्यटन राजधानी म्हणून हा निर्णय घेण्यास हरकत नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे मत आहे. शहरातील किमान ३० ते ३५ हॉटेल्सला प्रयोगिक तत्त्वावर परवानगी द्यावी, अशी मागणीही पुढे येते आहे. मुंबई येथे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी हा विषय मुंबई महापालिकेकडे लावून धरला होता.

अभ्यास केला जाईल
^शहरात रात्रभर हॉटेल सुरू ठेवण्याची गरज आहे का? याबाबत अभ्यास करावा लागेल. पर्यटन वाढीस त्याचा काय फायदा आहे हे पाहू. राजेंद्र सिंह, पोलिस आयुक्त
हरकत नाही
^पर्यटकांसह स्थानिक नागरिकांना फायदा होईल. प्रायोगिक तत्त्वावर काही हॉटेलात हा प्रयोग राबवण्यास हरकत नाही. शिवाजी पाटील, अध्यक्ष, हॉटेल संघटना
वेळ वाढवावा
^सध्या बार आणि हॉटेल्ससाठी असलेला वेळ खूप कमी आहे. पर्यटनाचा विचार करता वेळ वाढवण्यास हरकत नाही. शहरातील मोजक्या हॉटेलात ही सुविधा उपलब्ध करून देण्यास हरकत नाही. जयमलसिंग रंधवा, अध्यक्ष बार असोसिएशन.