आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक पिशव्यांवर जानेवारीपासून बंदी, आढळल्यास गुन्हा नोंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पन्नास मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या बंद करा. एक जानेवारीपासून एकही पिशवी दिसता कामा नये. नसता गुन्हे दाखल करू असे ठणकावत मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कचरामुक्त औरंगाबादच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले.

औरंगाबाद मनपाचे कोलमडलेल्या घनकचरा व्यवस्थापनाला शिस्त लावण्यासाठी मनपा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आल्यापासून प्रयत्न सुरू केले आहेत. यंत्रणेला शिस्त लावण्यासाठी शिवाजी झनझन यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापनाचा कार्यभार सोपवला. त्यानंतर त्यांनी कचरा वेचक त्या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनाही त्यात सहभागी करून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आता त्यांनी प्लास्टिकवर मोहरा वळवला आहे.

शहराच्या कचऱ्यातील नष्ट होणारा घातक कचरा प्लास्टिकचा असून त्याने पर्यावरणाचे मोठे प्रश्न निर्माण होत आहेत. त्यातही शहरात सर्रास दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असल्याने सगळीकडे प्लास्टिकच्या पिशव्यांचेच राज्य दिसत आहे. त्यामुळे आता याला रोखण्यासाठी आज आयुक्तांनी व्यापाऱ्यांची बैठक बोलावली. त्यात त्यांनी ५० मायक्राॅनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर तातडीने बंद करण्याच्या सूचना केल्या. एक जानेवारीपासून शहरात प्लास्टिकच्या पिशव्या दिसल्या तर गुन्हे दाखल करू असेही ते म्हणाले.

मनपानिधी मागणार
घनकचराव्यवस्थापनाची यंत्रणा बळकट करण्यासाठी मनपा शासनाकडे १२५ वाहनांच्या खरेदीसाठी निधी मागण्याच्या विचारात आहे. कचरा संकलन वाहतुकीसाठी टाटा एस विथ क्लोज बिन प्रकारच्या गाड्या खरेदी करण्याचा मनपाचा मानस आहे. प्रत्येक वाॅर्डासाठी एक या प्रमाणे ११५ १० राखीव अशा १२५ गाड्या तीन काॅम्पॅक्टर खरेदी करण्यासाठी मनपाला निधी हवा आहे. राज्य शासनाने १४ व्या वित्त अायोगाच्या माध्यमातून स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत वर्ग मनपा नगर परिषदांना निधी वितरित केला. औरंगाबाद मनपा वर्गातून वर्गातून गेल्याने मनपाला हा निधी मिळू शकला नाही. त्यामुळे विशेष बाब म्हणून हा निधी द्यावा अशी मनपा शासनाकडे मागणी करणार आहे. या आशयाचा प्रस्ताव १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत घनकचरा व्यवस्थापन कक्षाच्या वतीने ठेवण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...