आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारांना निवडणुकीत तडीपार करा: सहारिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी, मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावे, यासाठी निवडणुकीच्या कालावधीत गुन्हेगारी प्रवृत्तींच्या लोकांना तडीपार करा, असे स्पष्ट आदेश राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पोलिसांना दिले. 
 
नाशिकसह जळगाव, अहमदनगर येथील जिल्हा परिषद आणि नाशिक महापालिकेच्या निवडणुकीबाबत राज्य निवडणूक आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी शुक्रवारी नाशिक येथे निवडणूक तयारीचा आढावा घेतला. यावेळी ते पत्रकारांशी बोलताना सहारिया म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुुकीत आयोगाने अनेक बदल केले आहेत.
 
मतदारांसाठी तसेच उमेदवारांनाही नाव नोंदणीपासून ते उमेदवारी अर्ज सादरीकरण्याच्या प्रक्रीयेत तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपे केलं आहे. त्यामुळे अधिकाधिक मतदारांनी घराबाहेर पडत मतदान करावे, निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी आयोगाकडून जनतेत जनजागृती करण्यात येत आहे.
 
मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे, याकरिता विशेष प्रयत्न केले जात आहे. गुंडांना निवडणूक कालावधीत तडीपार करण्यासाठी प्रशासनाने त्वरीत कार्यवाहीस सुरुवात करावी. जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्तांनी यासंदर्भात बैठक घेत गोपनीय अहवाल तयार करून अशा लोकांना तडीपार करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता जिल्हास्तरावर मदत केंद्रही स्थापन करण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी आपल्या प्रतिनिधींची नेमणूक केल्यास त्यांनाही ऑनलाईन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्यात येईल.
 
प्रत्येक जिल्ह्यात संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्र निश्चित करत या ठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्याचे आदेशही देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखवले जातात, याबाबत आयोगाकडून कारवाई होत नसल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आयोग तरतुदीप्रमाणे कारवाई करतो.
 
आयोगाच्या अधिकारानुसार अशा प्रकारांमध्ये फौजदारी खटले दाखल केले जातात. मात्र, कारवाई करण्याचे अधिकार हे न्यायालयाला असल्याचे सांगत अधिक बोलणे त्यांनी टाळले. योगाकडे तक्रार आल्यास त्याची शहानिशा करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. 

जात-धर्मावरमतासाठी आयोगाची तयारी नाही 
सर्वोच्चन्यायालयाने नुकतेच धर्म, वंश, जात, समाज किंवा भाषेच्या आधारावर मत मागणे हा अपराध असल्याचा निकाल दिला. त्यामुळे निवडणुकीत त्याआधारावर मते मागितले जाऊ शकत नाही. मात्र अनेक राजकीय पक्ष याच आधारावर मत मागत असल्याचे दिसून येते.
 
याबाबत राजकीय पक्ष जागरूक आहेत ते असे करणार नाहीत, याचा मला विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाई करू असेही त्यांनी सांगितले. 
 

नगरपरिषद निवडणुकीत १० हजार गुंड तडीपार 
जिल्हापरिषद आणि महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात २०० गुंडाना तडीपार करण्यात आले. भरारी पथकांमार्फत २६ कोटी रुपयांच्या नोटा, १० कोटींचा मद्यसाठाही जप्त करण्यात आल्याचे सहारिया यांनी सांगितले.