आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एटीएममधून कमी रक्कम आल्यास सात दिवसांत द्या तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एटीएमद्वारे व्यवहार करताना रक्कम कमी मिळाल्यास ग्राहकांनी प्रथम टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवून आपले खाते असलेल्या बँकेलाही कळवणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया सात दिवसांत केल्यास ग्राहकास कमी आलेली रक्कम खात्यात जमा करणे शक्य होईल. प्रत्येक एटीएममध्ये सीसीटीव्ही अनिवार्य केली असून मागणी केल्यास ग्राहकास फुटेज उपलब्ध करून देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.
बॅँकिंग क्षेत्रात प्रगत तंत्रज्ञानामुळे मोठी सुविधा झाली असली तरी समस्यांमध्ये वाढ झाली आहे. गल्लोगल्ली वाढलेल्या एटीएमच्या संख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासकीय बँकांच्या एटीएममध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले आहे. खासगी बँकांच्या एटीएमची संख्या कमी असून सुरक्षा रक्षकाच्या नियुक्तीमुळे चोऱ्यांवर उपाय शोधलेला आहे. एटीएममधून ग्राहकाला रक्कम काढताना कमी रक्कम हातात येण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. कमी रक्कम आल्याने ग्राहक घाबरून जातो. परंतु अशा प्रकरणात ग्राहकाने वेळीच तक्रार नोंदवली तर रक्कम वेळेत परत मिळणे शक्य आहे.
खराब नोटा वेगळ्या डब्यात
मागणी केल्यापेक्षा कमी नोटा आल्या असल्या तरी उर्वरित नोटा खराब असल्यास त्या वेगळ्या डब्यात जमा झालेल्या असतात. कधी कधी काही वेळात निघालेली रक्कम परत खात्यात जमा होते. कधी काही दिवसांनंतर जमा होते. शिल्लक राहिलेल्या नोटा एटीएमचे काम ज्या एजन्सीला दिलेले असते ती एजन्सी दुसऱ्या दिवशी बँकेत जमा करते. एकूण दिवसभर झालेल्या व्यवहारावरून संबंधित नोटा कुठल्या ग्राहकाच्या आहेत हे निष्पन्न होते. परंतु ग्राहकास कमी आलेली रक्कम मिळण्यास मात्र विलंब लागतो.
ग्राहकास सीसीटीव्ही फुटेज देणे कायद्यानुसार बंधनकारक
तुमचा व्यवहार सीसीटीव्हीमध्ये टिपला जाण्याची दक्षता घ्या.
एटीएमची पावती सुरक्षित राहील याची काळजी घ्या.
नोटा कमी, फाटक्या असल्यास टोल फ्री क्रमांकावर कळवा.
एटीएममधून बाहेर पडलेल्या नोटा तेथेच नीटपणे तपासून घ्या.
एसबीआय एटीएमची मर्यादा
प्लॅटिनम कार्ड कॅश ७५ हजार रुपये खरेदी लाख रुपये प्रतिदिन
गोल्डन कार्ड कॅश ५० हजार रुपये खरेदी लाख रुपये प्रतिदिन
नॉर्मल एटीएम कॅश ४० हजार खरेदी ७५ हजार रुपये प्रतिदिन
का येतात कमी नोटा
एटीएममधून कमी नोटा येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. इंटरनेटमुळे असे घडते, तर अनेक वेळा सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे अशा बाबी घडतात. मशीन आणि स्विच यामधील कनेक्टिव्हिटीमुळे अडचण निर्माण होते. नोटा खराब आल्यास अशा नोटा शिल्लकच्या डब्यात पडतात. शंभर, पाचशे हजारच्या नोटांचे कमी प्रमाण असल्यास काही नोटा कमी येतात. दोन हजार रुपये काढायचे झाल्यास तीन नोटा पाचशेच्या पाच नोटा शंभरच्या येतात. कधी हजारच्या नोटाही येतात. यातील काही नोटा संपल्या तर कमी नोटा येण्याची शक्यता असते.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कशी करावी तक्रार...