यांचे शिक्षकदिनी ( सप्टेंबर रोजी) होणाऱ्या भाषणाची उत्सुकता विद्यार्थी शिक्षकांना लागली आहे. मात्र, पंतप्रधानांचे भाषण दाखवताना भारनियमन, बंद पडलेल्या टीव्ही संचाची अडचण मुख्याध्यापकांसह शालेय समितीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
पैठण तालुक्यात २५६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तर खासगी १०२ शाळा आहेत. या शाळांना १२ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेकडून टी. व्ही. संच देण्यात आले होते. मात्र, हे संच सध्या बंद आहेत. सध्या केवळ २० ते २५ शाळांकडे एलसीडी सुरू आहेत. याद्वारे पंतप्रधान मोदींचे भाषण दाखवण्याची शिक्षकांनी तयारी चालवली आहे. परंतु भारनियमनाची समस्या भाषण दाखवताना अडचण निर्माण करणार आहे. असे असताना ज्या शाळेत विजेची सुविधा नाही त्या ठिकाणी जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे शालेय व्यवस्थापन समितीची डोकेदुखी वाढल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. पंतप्रधानांचे भाषण बंधनकारक करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांची गैरसोय होता कामा नये, अशा सूचना शाळांना दिल्या आहेत. मोदींच्या भाषणासाठी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जयश्री चव्हाण, गटशिक्षण अधिकारी
पंतप्रधान विद्यार्थ्यांसाठीच्या
आपुलकीतून हे भाषण देणार असल्याचे कळल्याने त्यांचे भाषण आमच्या भविष्यासाठी मोलाचे असेल. ज्योती मगर, विद्यार्थिनी.
शाळामधील विविध कामकाज पाहत असताना मुख्याध्यापकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यात पंतप्रधानांच्या भाषणासाठी त्यांना सर्व साहित्याची जुळवाजुळव करावी लागत आहे. त्यामुळे मोदींचे भाषण दाखवणे बंधनकारक नसावे-
बाबासाहेब पवार,युवककाँग्रेस उपाध्यक्ष.