औरंगाबाद - शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे भाषण शाळांतून ऐकवण्याची सक्ती करणारे लेखी आदेश केंद्राने राज्यातील शिक्षण विभागांना दिले होते. परंतु मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र याबाबत सक्ती नसून, शाळांसाठी हा मुद्दा ऐच्छिक असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण उपसंचालकांनीही तशी सक्ती नसल्याचे म्हटले आहे.
मोदी शाळांतील मुलांशी संवाद साधणार आहेत. राज्यातील शिक्षण विभागाला आलेले पत्र शाळांना पाठवण्यात आले असून, मुलांना हजर ठेवण्याचे आदेश त्यात आहेत. यावर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्मृती म्हणाल्या, पंतप्रधानांनी असा संवाद साधण्यात गैर काय? काही लोकांनी त्याविरुद्ध अपप्रचार चालवला आहे.
दरम्यान, मुलांना पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी ही संधी आहे. यात सक्ती नाही, असे िशक्षण
उपसंचालक सुधाकर बनाटे म्हणाले.